अल्पवयीन मुलीस दोघांनी फूस लावून पळविले

crime news
crime newsesakal

चाळीसगाव : तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या घरच्यांनी लग्नास नकार दिल्याचा राग येऊन दोघांनी मुलीला पळवून नेल्याची थरारक घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी पीडितेच्या वडिलांनी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

crime news
जळगाव : सव्वा लाखाच्या बोकडांची चोरी

तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीसाठी घोडेगाव येथून विवाहासाठी स्थळ आला. सदर गोष्ट वर्षभर चालली. मात्र सदर स्थळ मुलीच्या वडिलाला आवडल नाही. म्हणून त्यांनी समोरच्या भावी वराला वारंवार नकार दिला.

याचाच राग आल्याने भावी वरासह एकाने माझ्या मुलीला पळवून नेले असावे असा संशय घेत पीडितेच्या वडिलांनी चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्थानक गाठून संशयित आरोपी जगन परशराम राठोड व मनेश धनराज राठोड दोन्ही रा. घोडेगाव ता. चाळीसगाव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तत्पूर्वी या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरु आहे.

crime news
Jalgaon : सॉफ्टवेअर अभियंत्याला भामट्यांनी लुटले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com