२४ ट्रॅक्टर्सचा लिलाव अवैध वाळू वाहतूक प्रकरणी तहसीलकडून कार्यवाही

अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी जळगाव तहसील कार्यालयाने २४ ट्रॅक्टर्स, ट्रक व डंपरवर जप्त केले
24 tractors auctionTehsil action in case of illegal sand transport
24 tractors auctionTehsil action in case of illegal sand transportsakal

जळगाव : तालुका हद्दीत अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी जळगाव तहसील कार्यालयाने २४ ट्रॅक्टर्स, ट्रक व डंपरवर जप्त केले आहेत. त्यांच्याकडून ३३ लाख ४० हजारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. मात्र, वाहनमालकांनी दंड न भरल्याने या वाहनांचा १२ फेब्रुवारीस तहसील कार्यालयात लिलाव करण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार नामदेव पाटील यांनी दिली.

जळगाव तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतूक करीत असताना, २२ ट्रॅक्टर्स व दोन डंपर तहसील कार्यालयाने जप्त केली होती. या वाहन मालकांविरुद्ध ३३ लाख ४० हजार २६१ रुपये दंडात्मक कारवाईचे आदेश दिले आहेत. दंडात्मक कारवाईच्या आदेशानुसार वाहनमालकांनी रक्कम शासनजमा केली नाही. त्यामुळे ती वाहने जंगम मालमत्ता अटकावून ठेवण्याचे अधिपत्र नमुना ३ कार्यवाहीतील रक्कम वसुलीसाठी जप्त वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे. या लिलावासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी मूल्यांकन केले. त्यानुसार २६ वाहनांची मूल्यांकन रक्कम ४५ लाख ७५ हजार रुपये आली आहे. जप्त केलेल्या वाहनांच्या लिलावाबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी निश्चित केलेले वाहनाचे मूल्यांकन किंवा प्रलंबित दंडाची थकबाकी रक्कम यापैकी जी रक्कम जास्त असेल, ती हातची किंमत म्हणून धरण्यात येणार आहे.

लिलाव होणारी वाहनांची क्रमांक अशी : (एमएच १८, बी ७६८६), (एमएच १९, एपी ९९६०), (एमएच १९, बीजी ७६९०), (एमएच १९, बीजी १०५३), (एमएच ४१, जी ६३३७), (एमएच १०, ए ९७३०), (एमएच १९, एएच ५२५०), (एमएच १९, एएन ४६७०), (एमएच ३७, एफ ०३२१), (एमएच १९, बीजी ५०१८), (एमएच १९, सीव्ही ५४६४), (एमएच १९, एएन ९६१४), (एमएच २८, बी ७९६१), (एमएच १९, वाय १५५३), (एमबीएनएव्ही ५३, एसीकेएन ४२२३५), (एमएच १९, पी २४४४), (जीजे ३४, टी १७६९), (एमबीएनएव्ही ५३, एसीकेए २१६३१), (एमएच १९, आय ४७९६), (डब्ल्यूक्यूए ४०६०६१२३७७०), (एमएच १९, एपी ८१५९), (एमएच १९, बीएम ७०७०), (एमएच ०४, जीएफ ८६८६).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com