दुबार नुकसान झालेल्यांचे अर्ज घेऊन पंचनामे करा : गुलाबराव पाटील

Gulabrao Patil In Meeting
Gulabrao Patil In Meetingesakal

जळगाव : पूर्व मोसमी पाऊस (Pre monsoon Rain) व वादळाने (Storm) केळीचे (Banana) मोठे नुकसान झाले आहे. जर परत नुकसान झाले असेल तर विमा कंपनीने अशा शेतकऱ्यांचे अर्ज घेऊन परत त्यांचे पंचनामे करावेत, अशा सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao patil) यांनी सोमवारी (ता. १३) झालेल्या बैठकीत दिल्या. (Gulabrao Patil Statement on monsoon damaged crops jalgaon News)

Gulabrao Patil In Meeting
Jalgaon : पावसाने तालुक्यातील 6 गावांत घरांचे नुकसान

जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, उपसंचालक अनिल भोकरे, उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, विमा कंपनी आणि वीज कंपनीचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. शेतकरी प्रतिनिधी म्हणून चर्चेत एस. बी. पाटील यांनी भाग घेतला. भागवत महाजन, संदीप महाजन, महेश महाजन, जीवन पाटील, डॉ. सत्वशील पाटील, अजित पाटील उपस्थित होते. जिल्ह्यातील वादळात झालेल्या नुकसानीचा अहवाल त्वरित सादर करा, भरपाईसाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. दुसऱ्यांदा नुकसान झालेल्या केळी पिकांचा विम्यासंदर्भात आधी ऑनलाइन तक्रार दाखल केलेल्या व परत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे ऑफलाईन अर्ज घेऊन त्यांचे तत्काळ पंचनामे करून त्यांची प्रत शेतकऱ्यांना देण्यात यावी, विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशा सूचनाही देण्यात आल्या.

Gulabrao Patil In Meeting
चाळीसगाव : नगरपालिकेचे आरक्षण सोडत जाहीर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com