अवैध वाळुचे डंपर पोलिसांकडून जप्त; चालकाविरोधात गुन्हा

गणेश कॉलनीतून अवैध वाळूची वाहतूक करणारे डंपर पोलिसांनी पकडले.
crime news
crime newsesakal

जळगाव : शहरातील गणेश कॉलनीतून अवैध वाळूची वाहतूक करणारे डंपर पोलिसांनी पकडले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, डंपर जप्त करण्यात आले आहे.

गणेश कॉलनी भागात गुरुवारी (ता. ९) पहाटे चारच्या सुमारास पोलिस कर्मचारी गस्तीवर असताना, विना क्रमांकाचे डंपर वाळू वाहतूक करीत असताना आढळून आले. वाळू वाहतुकीचा परवाना असल्याबाबत विचारले असता, चालक पंढरी बाबूलाल कोळी (वय ३०, रा. वाल्मिकनगर, जळगाव) याने परवाना नसल्याचे सांगत उडवाउडवीचे उत्तरे दिली. पोलिसांनी वाळूने भरलेले डंपर जप्त करून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात जमा केले. याप्रकरणी हवालादार तेजराव हुडेकर यांच्या फिर्यादीवरून चालक पंढरी कोळीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक निर्मल चव्हाण तपास करीत आहे.

crime news
Jalgaon : पाटील कन्स्ट्रक्शनची 45 लाखांत फसवणूक
crime news
"कोण होणार करोडपती" या कार्यक्रमात जिंकले साडेबारा लाख रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com