कापूस नसल्याचा फटका; जिनिंग, प्रेसिंग उद्योगाला १८०० कोटींचा तोटा

कापूस नसल्याचा परिणाम; गाठी तयार करण्याचा हंगाम यंदा चार महिने अगोदर संपला
Loss of 1800 crores ginning industry lack of cotton jalgaon
Loss of 1800 crores ginning industry lack of cotton jalgaonsakal

जळगाव : कपाशीला कधी नव्हे, एवढा नऊ ते दहा हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. शेतकऱ्यांकडून कापूस घेऊन गाठी तयार करून त्याची निर्यात करण्यासाठी जून-जुलैपर्यंत जिनिंग, प्रेसिंग उद्योग सुरू राहात होते. यंदा मात्र बाजारात कापूसच येत नसल्याचे ९० टक्के जिनिंग, प्रेसिंग मिल बंद झाल्या आहेत. फेब्रुवारीअखेर सर्वच जिनिंग कापसाअभावी बंद होतील. यामुळेच जिनिंग, प्रेसिंग उद्योगाला यंदा अठराशे कोटींचा तोटा होणार आहे.

Loss of 1800 crores ginning industry lack of cotton jalgaon
धुळे तालुक्याला २९ कोटी २१ लाख प्राप्त ; कुणाल पाटील

दर वर्षी जिल्ह्यातून पंधरा लाख कापूस गाठी जिनिंग, प्रेसिंगमध्ये तयार होऊन निर्यात होत असे. यंदा पावसाळा चांगला होता. कापूस हंगामही चांगला होता. मात्र तीन-चार वेळा झालेल्या अतिवृष्टीने कापूस उत्पादनात घट आली. या घटीमुळे कापूस कमी प्रमाणात बाजारात येऊ लागल्याने दसरा, दिवाळीच्या काळात कापसाला साडेआठ ते नऊ हजार असा दर मिळत होता. आता तो दर साडेनऊ ते दहा हजारांपर्यंत प्रतिक्विंटल झाला आहे. असे असले तरी बाजारात कापूस विक्रीसाठी हव्या त्या प्रमाणात आला नाही. सुरवातीस सर्व जिनिंग मिल्स सुरू होत्या. नंतर मात्र कापूस दर वाढवूनही कापूस बाजारात येत नसल्याने चोवीस तास सुरू असलेल्या जिनिंग तीन दिवसांवर सुरू ठेवण्यात आल्या. नंतर तीन दिवसांतून अन् तेही एका पाळीत काम सुरू होते. आताही तीच स्थिती आहे. गेल्या तीन दिवसांपासून बाजारात कापूस विक्रीस आलेला नाही. यामुळे जो शिल्लक कापूस आहे त्याच्या गाठी बनविण्याचे काम सुरू आहे. तोही कापूस फेब्रुवारीअखेर संपेल.कापसाची प्रचंड आवक दर वर्षी होत होती. यामुळे जून-जुलैपर्यंत जिनिंग सुरू असायच्या. यंदा तब्बल चार महिने या मिल्स बंद होणार आहेत.

Loss of 1800 crores ginning industry lack of cotton jalgaon
Viral | वेटरनेच मारला हॉटेलच्या पैशांवर डल्ला; चोरी करुन पसार

केवळ नऊ लाख गाठींचे उत्पादन

यंदा पंधरा लाख गाठींचे उत्पादन करू, असे खानदेश जिनिंग, प्रेसिंग मिल ओनर्स असोसिएशनने ठरविले होते. असे असले तरी कापसाअभावी आतापर्यंत आठ लाख गाठींचे उत्पादन झाले आहे. आगामी दहा दिवसांत आणखी एक लाख असे एकूण नऊ लाख गाठींचे उत्पादन होईल. पंधरा लाख गाठी निमिर्तीतून चार हजार पाचशे कोटींची उलाढाल होत असे. यंदा नऊ लाख गाठीतून केवळ सत्तावीसशे कोटींची उलाढाल होईल. अठराशे कोटींचा तोटा या उद्योगाला कापसाअभावी सहन करावा लागणार आहे.

कापूस गाठींची निर्मिती यंदा पंधरा लाख गाठींपेक्षा अधिक होणार, असे चित्र चांगल्या पावसामुळे सुरवीस होते. मात्र अतिवृष्टीने कापूस उत्पादन कमी झाले. शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला भाव मिळाला, असे असताना कापसाची बाजारातील आवक बंद झाल्याने यंदा लवकर जिनिंग मिल्स बंद कराव्या लागतील.

-प्रदीप जैन, अध्यक्ष,खानदेश जिनिंग, प्रेसिंग मिल्स ओनर्स असोसिएशन

गेल्या तीन दिवसांपासून बाजारात एक क्विंटलही कापूस विक्रीस आलेला नाही. कापूस शेतकऱ्यांकडे नाही. यामुळे यंदा केवळ आठ ते नऊ लाख गाठी उत्पादित होतील. यंदा या व्यवसायातील उलाढाल कापसाअभावी कमी होणार आहे.

-अविनाश काबरा, सदस्य, खानदेश जिनिंग, प्रेसिंग मिल्स ओनर्स असोसिएशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com