योगासने ही व्‍यायाम म्हणून नाही करायची..; काय आहे योगा जाणून घ्या

योगासने ही व्‍यायाम म्हणून नाही करायची..; काय आहे योगा जाणून घ्या
international yoga day
international yoga dayinternational yoga day

जळगाव : कोरोनाच्‍या (Coronavirus) काळात योग व प्राणायामाला खूप म‍हत्त्व आले आहे. योगामुळे कोरोनाला नक्‍कीच पळवून लावू शकतो, असे म्‍हटले जातेय. याकरिता योगा करणे महत्त्वाचे ठरते; परंतु अनेक जण योगा करणे म्‍हणजे व्‍यायामाचा प्रकार मानत त्‍यादृष्‍टीने योगा करतात. मात्र असे न होता योगा हा व्‍यायामाच्‍या स्‍वरूपात न करता त्‍याला मूळ स्‍वरूपातच करायला हवे; असे मत योगतज्ज्ञांनी (international yaga day) आंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त ‘सकाळ’शी बोलताना व्‍यक्‍त केले. (jalgaon-international-yaga-day-Yoga-should-not-be-exercise)

योगासने म्हणजे व्यायाम नव्हे, हे लक्षात असायला हवे. योगासन म्हणजे शरीरातील ऊर्जा एका ठराविक दिशेला नेऊन सक्रीय करणारी नाजूक प्रक्रिया आहे. सामान्यतः व्यायाम म्हटलं की जितका अधिक जोर लावला तितके जास्‍त शरीर मजबूत होते; अशी वृत्ती आहे. तर योगासने असे कठीण परिश्रम करून करायचे नसतात. आसन म्हणजे शरीराची एक स्थिती असून, अशी स्थिती जी जीवनाच्या उच्च शक्यतेकडे घेऊन जाते.

international yoga day
रात्रभर जळगाव शहर चोरट्यांच्या ताब्यात..; लॉकडाउननंतर चोरटेच ‘अनलॉक’

योगा, शुद्धिक्रियाद्वारे कोरोनाला दूर ठेवू शकतो

कोरोनाच्‍या काळात योग, प्राणायाम, शुद्धिक्रिया याला अधिक महत्त्‍व आले असून, यामुळे कोरोनावर प्रतिबंध घालू शकतो. नियमित योगा, शुद्धिक्रिया केल्‍या तर कोरोनाला पळवून लावू शकतो. आजच्‍या काळात योगाला अनेकांनी जवळ केले असून, चांगल्‍या प्रकारे योगासन व प्राणायाम करून ऑक्‍सिजन लेव्‍हल वाढवू शकतो. शिवाय, मानसिकता चांगली ठेवण्यासाठी मदत होत आहे.

- डॉ. अनिता पाटील, आंतरराष्‍ट्रीय योग पंच

व्‍यायाम नव्‍हे तर मुळ स्‍वरूपात योगा व्‍हावा

योग हे संयमाधिष्ठित शास्‍त्र आहे. आज प्रत्‍येक जण योगा करतोय. पण तो व्‍यायामाच्‍या दिशेने केला जातोय. योगा व्‍यायामाच्‍या पातळीवर न करता तो मूळ स्‍वरूपात करायला हवा. कोरोनाच्या बाबतीत सांगायचे झाले तर कोरोना श्वसनसंस्थेवर आक्रमण करतो आणि योग विशेषत: प्राणायाम हा श्वसनसंस्थेला मजबूत करतो. प्राणायामामधून ऊर्जा निर्माण केली जाते तर ध्यानामधून ऊर्जेची बचत केली जाते आणि कोरोनाच्या काळात आजाराशी लढण्यासाठी ऊर्जा म्हणजेच प्रतिकारशक्ती खूप महत्त्वाची आहे.

-डॉ. आरती गोरे, योगा कन्‍सल्टंट, माजी अध्‍यक्ष, योग अभ्‍यास मंडळ, उत्तर महाराष्‍ट्र विद्यापीठ

international yoga day
अ‘सहकार’ करणाऱ्या गद्दारांना धडा शिकवू : सहकार गटनेते उदय पाटील

नित्‍य साधना करून रुग्ण लवकर झाले बरे

योगसाधना ही सर्व विकारांवर उपयोगी सिद्ध होत आहे, तर योगसाधनेस अल्टरनेटिव्ह थेरेपी म्हणून संपूर्ण देशात मान्यताप्राप्त झाली आहे. स्वतः दुसऱ्या लाटेत शहरातील काही रुग्णालयांत कोरोना रुग्णांना प्राणायामाचे धडे देण्यासाठी जात होतो. यात आश्चर्यकारक असे अनुभव मिळाले आहेत. अनेक रुग्ण नित्य साधना करून लवकर बरे झाले, तर काहींची रोगप्रतिकारकशक्ती वाढून विविध व्याधीसुद्धा बरी झाल्याचे आढळून आले आहे. ग्रंथांमध्येसुद्धा योगसाधनेतून मिळणारी पहिली सिद्धी म्हणजे शरीरस्वास्थ्य होय, असा उल्लेख करण्यात आला आहे.

-कृणाल महाजन, रिसर्च स्कॉलर (Ph.D.) योगा, सचिव, निर्धार योग प्रबोधिनी

डॉक्‍टरांनीही अवलंबला प्राणायाम

कोरोनाच्‍या काळात योगाला सर्वात जास्‍त महत्‍त्‍व राहिले. डॉक्‍टरांनीच प्राणायामाचा आधार अवलंबला व रुग्णांना प्राणायाम करण्यास सांगितले. ओंकार व ब्राह्मरी प्राणायाम केल्‍यास यातून शरीरात नायट्रस ऑक्साइड तयार होतो व विषाणू शरीरात जाण्यास प्रतिबंध होता. यामुळे रोगप्रतिकार शक्‍ती वाढते. यामुळे योगा व प्राणायाम करणे उत्‍तम आहे.

– हेमांगिनी सोनवणे, योग व आहार तज्ज्ञ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com