Marriage
Marriageesakal

साखरपुड्यातच उरकला विवाह; समाजापुढे नवा आदर्श

पटेल बिरादरीच्या लोकांनी साखरपुड्यात विवाह करून एक चांगला आदर्श प्रत्येक समाजापुढे ठेवला आहे.

यावल (जि. जळगाव) : कोरपावली (ता. यावल) येथील फिरोज कुलकर्णी यांची सुकन्या सुमैय्याबी आणि जळगाव येथील इरफान पटेल यांचे पुत्र इमरान यांचा साखरपुडा कोरपावली येथे होता, परंतु नातेवाईक आणि पटेल बिरादरीच्या समाजातील ज्येष्ठ लोकांनी वधू आणि वरांच्या मंडळींसमोर साखरपुड्यातच लग्न लावून देण्याचा प्रस्ताव मांडला व दोन्ही वर- वधू पक्षांकडील मंडळींनी प्रस्ताव लगेच स्वीकार केला. या महागाईच्या काळात गोरगरीब जनतेचे अतोनात हाल होत असताना अशा प्रकारे विवाह करून सगळ्या गोष्टीची होत असलेली बचत, विनाकारण होणारा खर्च वाचला. वर व वधू दोन्हीकडील मंडळी तसेच पटेल बिरादरीच्या लोकांनी साखरपुड्यात विवाह करून एक चांगला आदर्श प्रत्येक समाजापुढे ठेवला आहे.

मौलाना शम्स तबरेज यांनी कुदबा पठण करून निकाह लावला. या आदर्श विवाहाचे माजी सरपंच जलील पटेल, उपसरपंच मुक्तार पटेल यांनी कौतुक करून वधू-वरास व त्यांच्या नातेवाईकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या सोबत वरपिता इरफान पटेल, वधुपिता फिरोज कुलकर्णी, हाजी हारुन पटेल, महंमद पटेल, हुसेन पटेल, मुबारक पटेल, इरफान पटेल, शरीफ पटेल, सादिक पटेलसह पटेल समाज बांधव उपस्थित होते.

Marriage
विवाहाचे आमिष दाखवून वरपित्याची फसवणूक; वधूसह 2 जणांविरोधात गुन्हा
Marriage
युवा शेतकऱ्याची नाविन्यपूर्ण शेती; टरबुजाचे एकरी 30 टन विक्रमी उत्पादन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com