‘म्हाडा’ पेपरफूट प्रकरणाचे जळगावात ‘खोदकाम’

शिक्षक पात्रता पूर्वपरीक्षा टीईटी घोटाळ्याचा तपास करणाऱ्या पुणे पोलिसांच्या विशेष पथकाने जळगावात दिवसभर धाडसत्र राबवून रात्रीपर्यंत अनेकांची चौकशी केली.
Mhada Exam
Mhada Examesakal

जळगाव : शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) गैरव्यवहार प्रकरणाचा तपास करताना मिळालेल्या धाग्यादोऱ्यांच्या आधारे पुणे पोलिसांच्या विशेष पथकाने गुरुवारी (ता. २६) म्हाडा पेपरफुटीतील मुख्य संशयित ॲड. विजय दर्जीला जळगावच्या गोलाणी व्यापारी संकुलातील कार्यालयातून ताब्यात घेतले. रीतसर अटक करून संशयित ॲड. दर्जी याला घेऊन पथक पुण्याला रवाना झाले आहे.

शिक्षक पात्रता पूर्वपरीक्षा टीईटी घोटाळ्याचा तपास करणाऱ्या पुणे पोलिसांच्या विशेष पथकाने जळगावात दिवसभर धाडसत्र राबवून रात्रीपर्यंत अनेकांची चौकशी केली. टीईटी घोटाळ्याचा तपास करत असतानाच जळगाव येथील बालाजी जॉब प्लेसमेंटचे ॲड. दर्जी याला पुणे पोलिसांच्या विशेष पथकाने म्हाडा पेपरफुटीप्रकरणी ताब्यात घेतले. गाजत असलेल्या टीईटी घोटाळ्यातून म्हाडा पेपरफुटीचे प्रकरण जळगाव जिल्ह्यापर्यंत पोचल्यामुळे जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Mhada Exam
जळगाव : रस्त्यांची दुर्दशा, त्यात दोषपूर्ण कामांनी नागरिकांचे हाल

काही एजंट अटकेत

टीईटी पेपरफूट प्रकरण जळगाव, भडगावसह यावल व पारोळा तालुक्यातील काही एजंटांमार्फत संपूर्ण जिल्ह्यात टीईटी घोटाळ्यातील गैरव्यवहाराला चालना देण्यात आल्याचे समजते. चौकशीनंतर तपासाची दिशा याच एजंटांच्या मागावर आली आहे. जी. ए. सॉफ्टवेअरचा संचालक डॉ. प्रीतीश देशमुख याच्याबरोबर सुरंजित गुलाब पाटील (वय ५०, रा. उत्तरानगर, नाशिक), स्वप्नील तीरसिंग पाटील (रा. शिक्षक कॉलनी, चाळीसगाव), जळगाव अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. धक्कादायक म्हणजे म्हाडा पेपरफुटीप्रकरणी पुणे पोलिसांनी काही कॉल रेकॉर्डिंग तसेच सोशल मीडियाचे स्क्रीन शॉटसह आणखी काही महत्त्वपूर्ण पुरावे गोळा केले असल्याचे तपासपथकातर्फे सांगण्यात आले.

दर्जीचा व्याप मोठा

टीईटी घोटाळ्यात बीडचा मुख्य संशयित राजेंद्र सानपच्या अटकेनंतर तो जळगावच्या विजय दर्जी याच्या संपर्कात असल्याचे मोबाईल सीडीआर रेकॉर्डवरून उघड झाल्यावर सानपच्या अटकेनंतर पुणे पोलिसांनी तपासासाठी दर्जीला टार्गेट केले. दर्जी जवळपास ४०० परिक्षार्थींच्या संपर्कात होता आणि तोच सानपचा एजंट निघाल्याची ठोस माहिती उपलब्ध झाल्यावरच त्याची अटक करण्यात आल्याचे सायबर गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी दिली आहे.

Mhada Exam
ऐकाव ते नवलच...! पठ्ठ्याला तब्बल 13 वेळा झालाय सर्पदंश

१० एजंट अन्‌ कोट्यवधीचा प्लॅन

डॉ. प्रीतिश देशमुख याने म्हाडाचा पेपर फोडण्यासाठी जवळपास १० एजंटांशी संपर्क केला. त्यांच्यामार्फत तो पेपर फोडण्याचा त्याचा कट असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या एजंटांनी परीक्षार्थींशी संपर्क साधून त्यांना पेपर कोरा सोडण्यास सांगण्यात येणार होते. त्यानंतर ओएमआर शीटमध्ये देशमुख फेरफार करुन त्या परिक्षार्थींना पास करण्यात येणार होते. हा त्यांचा बदललेला प्लॅन होता. दरम्यान, देशमुख याने पेपर देण्याच्या बदल्यात एजंटकडे एका परिक्षार्थीमागे दहा लाखांचा रेट ठरवला. मग एजंट संबंधित परिक्षार्थीमागे किती पैसे घेणार, हे त्या एजंटवर अवलंबून होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com