MNS Agitation
MNS Agitationesakal

Jalgaon : मनसेचे मनपासमोर ‘नळ-तोटी’ आंदोलन

जळगाव : अमृत पाणीपुरवठा योजनेंतर्गत (Water supply scheme) प्रत्येक अपार्टमेंटसाठी एकच नळ कनेक्शन देण्याच्या महापालिकेच्या (Jalgaon Municipal Corporation) धोरणाविरोधात मनसेने संघर्ष सुरू केला आहे. त्याचाच भाग म्हणून बुधवारी (ता. २२) मनसेने महापालिकेच्या इमारतीसमोर नळ- तोटी आंदोलन (Agitation) केले.(MNS water tap agitation in front of Jalgaon Municipal Corporation Jalgaon News)

शहरात २५ ते २५ वर्षे जुने शेकडो अपार्टमेंट आहेत. त्यामधील प्रत्येक फ्लॅटला स्वतंत्र नळजोडणी आहे. त्याद्वारे प्रत्येक फ्लॅटधारकांना स्वतंत्र शुद्ध पाणीपुरवठा होतो. अशा स्थितीत महापालिका प्रशासनातर्फे जुन्या अपार्टमेंटला पूर्वीप्रमाणे नळ कनेक्शन न देता एका अपार्टमेंटला एकच कनेक्शन देण्याचे तोंडी सांगितले जात आहे. त्यासाठी साठवण टाकी बनवावी, अशी सूचना दिल्या जात आहे. मात्र, या दोन्ही गोष्टी अशक्य असल्याचे मनसेचे म्हणणे आहे.

MNS Agitation
Nashik : गुप्तांगाला मार लागल्याने तरुणाचा मृत्यू

अशा आहेत मागण्या

जुन्या अपार्टमेंटला एक नळ कनेक्शन द्यावे, अथवा अपार्टमेंटमध्ये साठवण टाकी उभारावी, असा शासनाच्या नियमावलीत उल्लेख असलेल्या नियमावलीची प्रत देण्यात यावी, अमृत पाणीपुरवठा योजनेची नवीन नळजोडणी केल्याशिवाय जुनी नळजोडणी तोडू नये, ज्या अपार्टमेंटधारकांची जुनी नळजोडणी तोडली व नवीन दिली नाही, त्यांना पुन्हा नळजोडणी द्यावी, अशा मागण्यांचे निवेदन आयुक्तांना देण्यात आले.

MNS Agitation
पावसाळ्यातही 53 गावे-वस्त्यांची टँकर भागवताय तहान!

या वेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, शहराध्यक्ष विनोद शिंदे, शहर उपाध्यक्ष आशिष सपकाळे यांच्यासह पदाधिकारी व अपार्टमेंटमधील फ्लॅटधारक उपस्थित होते. जुन्या अपार्टमेंटला पूर्वीप्रमाणे नळ कनेक्शन देण्याबाबत एका महिन्यात निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त विद्या गायकवाड यांनी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com