पाचोऱ्यातून मोटारसायकल चोरट्यास अटक

मोटारसायकल चोरट्यांनी पोलिस यंत्रणेला पुरते जेरीस आणले असताना गुन्हे शाखा या चोरट्यांच्या मागावर लागली आहे.
Arrested
Arrestedesakal

जळगाव : शहरातून दिवसाला पाच मोटारसायकल चोरीला जात असून केवळ दोन-तीनच गुन्हे दाखल होत आहे. अशा अवस्थेत मोटारसायकल चोरट्यांनी पोलिस यंत्रणेला पुरते जेरीस आणले असताना गुन्हे शाखा या चोरट्यांच्या मागावर लागली आहे. काल दोन वाहन चोरट्यांना पकडल्यानंतर मंगळवारी (ता. ३१) पुन्हा पाचोरा तालुक्यातील एका वाहन चोरट्याला अटक करून त्यांच्या ताब्यातून तीन वाहने जप्त करण्यात आली.

वाहन चोरीच्या घटना वाढल्याने पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनात मोटारसायकल चोरट्यांसाठी गुन्हे शाखेचे स्वतंत्र पथक काम करत असून निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकातील विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, राहुल पाटील, प्रीतम पाटील, भरत पाटील अशांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे नाचणखेडा (ता. पाचोरा) येथील गोरख चंद्रसिंग ठाकरे याला ताब्यात घेतले. त्याने एका मागून एक तीन चोरीच्या मोटारसायकल काढून दिल्या असून आणखी एका गुन्ह्याची कबुली दिली आहे. गोरख ठाकरे याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून त्याची उशिरापर्यंत चौकशी सुरु होती.

Arrested
जळके-लोणवाडी रस्त्यावर वृद्धाला गंडवले
Arrested
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव लोगोचा जळगाव मनपास विसर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com