खड्ड्यांमुळे रस्त्यांची झाली चाळण

जळगाव : रस्त्यावर पडलेले खड्डे
जळगाव : रस्त्यावर पडलेले खड्डेesakal

जळगाव : तीन-चारवेळा खोदून एकदाही दुरुस्ती न होता खड्ड्यांनी चाळण झालेल्या रस्त्यांची जळगावत कमी नाही. मुख्य मार्गापासून नागेश्‍वर कॉलनी रिक्षा थांब्यापर्यंत जाणाऱ्या रस्त्याची हीच स्थिती. किमान तीनदा हा रस्ता खोदला, आडव्या चाऱ्याही दहा-बारा ठिकाणी मारल्या, पण दुरुस्तीचे एकदाही नाव नाही.

दुरवस्थेबाबत स्पर्धा घेतल्यास जळगाव शहरातील किमान शंभर रस्त्यांना पारितोषिक मिळेल. इच्छादेवी चौक ते डी-मार्ट, पांडे डेअरी चौक ते इच्छादेवी चौक, शाहूनगरातील तपस्वी हनुमान ते पिंप्राळा रेल्वेगेट, शिवाजीनगरचा रस्ता, काव्यरत्नावली चौक ते गिरणा टाकीपर्यंतचा मार्ग यांसारख्या अनेक मार्गांचे शब्दात वर्णन होणार नाही, एवढी दुरवस्था झाली आहे.

नागेश्‍वर कॉलनीचा रस्ता खड्ड्यात

अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी शहरातील सर्वच भागांतील रस्ते खोदण्यात आले. महाबळ ते संभाजीनगरपर्यंतचा मुख्य रस्ताही दोन्ही बाजूंनी खोदला. त्यावर पॅचवर्कही झाले. मात्र, या रस्त्यापासून त्र्यंबकनगर शाळेचा थांबा ते मध्ये नागेश्‍वर कॉलनी रिक्षा थांब्यापर्यंचा रस्ताही एक-दोनदा नव्हे, तर तब्बल तीनवेळा दोन्ही बाजूंनी खोदण्यात आला. त्यामुळे विकास आराखड्यात हा १८ मीटर रुंदीचा हा दोनशे मीटर लांबीचा रस्ता म्हणून शिल्लकच राहिलेला नाही. शिवाय अंतर्गत नळसंयोजनासाठी या रस्त्याला बारा ठिकाणी आडव्या चाऱ्याही मारण्यात आल्या.

इतक्यावेळा खोदून, इतक्या ठिकाणी ओरबाडूनही रस्त्याची एकदाही दुरुस्ती झालेली नाही. ‘अमृत’च्या कामात या रस्त्यावर पॅचवर्क झाले खरे, मात्र तेही थातूरमातूर. त्यामुळे रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झालीय.

जळगाव : रस्त्यावर पडलेले खड्डे
धावत्या रिक्षात जेष्ठ पत्रकाराचा मोबाईल लंपास

दुरुस्ती कधी?

या रस्त्याबाबत स्थानिक नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या. मात्र, महापालिका प्रशासनाकडून त्याची दखल अद्याप घेतलेली नाही. शिवाय, रस्त्यावर एका बाजूने मोठी बांधकामे सुरू असल्याने त्याचे बांधकाम साहित्यही वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरतेय. त्यामुळे पाऊस पडण्याआधी रस्त्याची किमान दुरुस्ती तरी करावी, अशी मागणी होत आहे.

"रस्ता दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र, सध्या डांबराची उपलब्धता नाही. डांबर आल्यानंतर या रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे."

-जितेंद्र मराठे, नगरसेवक, प्रभाग १३

जळगाव : रस्त्यावर पडलेले खड्डे
मान्सून हवामान खात्याचे अंदाज ठरवतोय ‘फोल’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com