जळगाव : दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ; नागरिकांमध्ये दहशत

दोन वेगवेगळ्या तक्रारीवरुन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
Two-wheeler theft
Two-wheeler theft esakal

जळगाव : शहरातील गणेश कॉलनी आणि त्या पाठोपाठ मलिकनगर भागातून मोटारसायकलींची चोरी करण्यात आली आहे. या प्रकरणी दोन वेगवेगळ्या तक्रारीवरुन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

गणेश कॉलनीतील रहिवासी रूपेश चंद्रकांत शेलार (वय २३) या विद्यार्थ्याकडे त्यांच्या मित्राची मोटारसायकल (एमएच १९ डीडी १२०६) होती. महाविद्यालय आणि शिकवणीसाठी तो त्या मोटारसायकलचा वापर करत होता. त्याने घरासमोर उभी केलेली मोटारसायकल चोरट्यांनी मध्यरात्री चोरुन नेली आहे. मोटारसायकलचा सर्वत्र शोध घेतला परंतु कुठेही मोटारसायकल आढळून आली नाही. अखेर शनिवारी (ता. १४) जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली असून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Two-wheeler theft
चौथा पती गळ्यात माळ टाकणार तोच...चतुर्भुज विवाहितेचा सिनेस्टाईल प्रताप

शहरातील मलिकनगरातील रहिवासी सज्जाद शाह अकबर शाह (वय २७) या व्यावसायिकाकडे (एमएच १९ डीएल ९०४०) क्रमांकाची दुचाकी होती. बुधवारी (ता. ११) रात्री १०.३० वाजता त्यांनी त्यांची दुचाकी त्यांच्या घराजवळील बॉम्बे बेकरीच्या गल्लीजवळ पार्किंग करून लावली होती. चोरट्यांनी मध्यरात्री ही दुचाकी चोरून नेल्याचे सकाळी उघडकीस आल्यावरून त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून चोरट्यांविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील करीत आहे.

Two-wheeler theft
Jalgaon : जुगार अड्ड्यावर राडा; जिंकणाऱ्यावर तिघांचा प्राणघातक हल्ला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com