एसटी वर्कशॉप मध्येच चोरट्यांचा डाका

Thief
Thiefesakal

जळगाव : शहरातील नेरीनाका भागातील एसटी (MSRTC) वर्कशॉपच्या (Workshop) आवारातून तीन बॅटरीज (Battery) चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. एमआयडीसी पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Thieves rob the ST workshop Jalgaon crime news)

शहरातील नेरी नाक्याजवळ एसटी वर्कशॉप असून येथे नादुरुस्त बसेसचे काम करण्यात येते. शनिवारी (ता. २१) मध्यरात्री चोरट्यांनी २५ हजार ५०० रुपये किंमतीच्या तीन बॅटरी चोरून नेल्याचे रविवारी (ता. २२) उघडकीस आले. नेहमीप्रमाणे सकाळी ८ वाजता एसटी कर्मचारी विनित विजयकुमार कुलकर्णी (वय ३४, रा. रामदेव बाबा मंदिराजवळ, भुसावळ) कामावर आले असता त्यांनी ठेवलेल्या या बॅटऱ्या आढळून आल्या नाही. परिणामी त्यांच्यासह इतरांनी वर्कशॉपमध्ये बॅटरीचा शोध घेतला. मात्र, बॅटऱ्या लंपास झाल्याची खात्री झाल्याने अखेर एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. विजय कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून चोरट्यांविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक सुनील सोनार करीत आहे.

Thief
जळगाव : शेतातून 45 हजारांच्या ठिबक नळ्या चोरी

चोरटा कोण?

एसटी वर्कशॉपला चोविस तास कडक सुरक्षा व्यवस्था आहे. चारही बाजूने सुरक्षा रक्षक येथे कार्यरत आहे. येणाऱ्या जाणाऱ्यांच्या नोंदी नियमित घेतल्या जातात. अशा परिस्थीतीत चोरटा आत येणे शक्य नाही. चोर आले तरी एसटीच्या अवजड बॅटऱ्या सहज उचलून नेणे शक्य नाही. परिणामी या चोरीत सहजपणे वर्कशॉप मध्ये ये-जा असणाऱ्याच चोरट्यांचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Thief
Jalgaon : MPSC ची मुख्य परिक्षा न झाल्याने विद्यार्थी तणावात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com