7 किमी पायपीट करून रोहिणीने मिळवले 91 टक्‍के

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 ऑगस्ट 2016

दाभोळ : धनगर समाजातील असलेल्या व दररोज 6 ते 7 किलोमीटरची पायपीट करून शाळेत जाऊन दहावीत 91 टक्‍के गुण मिळविणाऱ्या देवाचा डोंगर येथील रोहिणी बावधने या विद्यार्थिनीचा सत्कार धनगर समाज सेवा संस्थेच्या वतीने नुकताच करण्यात आला.
रोहिणी बावधने ही धनगर समाजातील विद्यार्थिनी देवाचा डोंगर ते जामगे हायस्कूलदरम्यान पायपीट करून शिक्षण घेत होती व तिने दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले. या गुणवंत विद्यार्थिनीचा गौरव धनगर समाज सेवा संघाच्या वतीने अध्यक्ष डॉ. रामचंद्र वाघ यांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमाला प्रा. डॉ. विक्रम मासाळ, प्रा. महादेव माने, प्रा. भीमराव ठवरे, प्रा. अंकुश हाके, प्रा. अर्जुन गरंडे, महादेव पिसे, दाभोळचे बंदर निरीक्षक सुनील पाटील, शंकर नायकवडे, दौलत वाघमोडे, तुषार माने, अंकुश गोफणे, राजेंद्र देवकाते, महेश कोकरे, देवाचा डोंगर येथील धनगर समाज कार्यकर्ते काशिनाथ झोरे आदी उपस्थित होते. 

टॅग्स