β कलरफुल पिलोज

कलरफुल पिलोज
कलरफुल पिलोज

गृह सजावटीमध्ये एखाद्या खोलीची शोभा वाढविण्यासाठी फर्निचर, पडदे कृत्रिम फुलांप्रमाणे त्याखोलीतील आसन व्यवस्थेवरील पिलोज अर्थातच भाव खाऊन
जातात. या पिलो कव्हरच्या ट्रेंडविषयी..

- नवजात बालकांसाठी पारंपरिक मोहरीची उशी शिवली जात असे. यामध्ये बदल होऊन आता त्यांच्या बाबागाडीत, हॅण्डबॅगमध्ये, मोटारीत ठेवण्यासाठी ‘यू’ शेप छोटे पिलोज् बाजारात आले आहेत. मुलांच्या आवडीनुसार त्यांच्यासाठी हत्ती,डोरेमन,किटी,स्माइली फेस, पेंग्विन, बेन-टेन अशा कार्टून व्यक्ती रेखांच्या
पिलोजची भरपूर व्हरायटी बाजारात असून ते १८० रुपयांपासून उपलब्ध आहेत.
- दिवाणखान्यातील सोफ्यावर, बीनबॅग, झोपाळ्यात, कारमध्ये, रुग्णांसाठी अशा विविध प्रकारच्या, आकाराच्या उशा बाजारात मिळतात. यामध्ये स्लिपिंग पिलो, स्पेशल पिलो, पॉलिस्टर पिलो, ट्रॅडिशनल पिलो, फेदर पिलो अशा मटेरिअलमध्ये त्या बनविल्या जातात.
- ट्रॅडिशनल पिलो म्हणजे कापसापासून बनविलेल्या, पॉलिस्टरचे धागे एकत्र करून बनविलेला कृत्रिम कापसाची पिलो म्हणजे पॉलिस्टर पिलो, पिसांपासून केलेली, जेल पिलो स्लिकॉन किवा पॉलियुरेथेन या मटेरिअलपासून बनविलेली असते. ती शरीरातील तापमान नियंत्रित करण्यास मदत करते.
- बेड पिलो या आकाराने मोठ्या आणि आडव्या असतात. कारमध्ये, सोफ्यावर ठेवण्यासाठी गोल, चौकोनी, आयताकृती, हार्ट शेप अशा लहान-मोठ्या आकारांच्या पिलो असतात.
- य पिलोजसाठी कव्हरही फ्रिंगिंग स्टाइलची, मिक्समॅच, थ्रीडी प्रिंट कव्हर्सना सध्या विशेष मागणी आहे. ऑनलाइन शॉपिंग कार पिलो, वेबसाईट्सवर कस्टमाइज पिलो कव्हर्स, कपल पिलो, तसेच मुलांच्या खोलीसाठी स्पेशल पिलोज आणि कव्हर्स उपलब्ध आहेत.
- थ्रीडी प्रिंट पिलो कव्हर्स मध्ये भारतातील लोकप्रिय वास्तू , भारतीय संस्कृतीची चिन्हे, प्राण्यांची चित्रे, पाना-फुलांचे डिझाईन, राजस्थानी प्रिंटची कव्हर्स
दोनशे रुपयांपासून तुम्ही खरेदी करू शकता. ट्रॅडिशनल पिलो कव्हर्समध्ये सिल्कच्या कापडाचे पॅचवर्क, एकाच डिझाईनची, तसेच घरामध्ये जुन्या साड्या, ड्रेसपासून करू शकता.
- सध्या या मिनी पिलोजचा ट्रेंड जोरात आहे. यामध्ये व्हरायटी आणि कलर काँबिनेशन भरपूर मिळतात. या पिलो १५०-२०० रुपयांपासून किरकोळ आणि गृह सजावटीच्या दुकानांमध्ये मिळतात. या दिवाळीत तुमच्या घराला शोभतील अशा पिलो कव्हर्सची नक्की खरेदी करा.
--
साप्ताहिक सकाळ
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com