मधमाशी पालनातून महिला सक्षमीकरण

मधमाशी पालनातून महिला सक्षमीकरण
मधमाशी पालनातून महिला सक्षमीकरण

महिलांना सक्षम बनवण्यासाठी जोसेफिन सेल्वराज यांनी मधमाशी पालन व्यवसाय सुरू केला. "द विबिज नॅचरल बी फार्म‘च्या त्या संस्थापक आहेत. मदुराई जिल्ह्यातील वाडीपट्टी तालुक्‍यात त्यांनी मधमाशी पालन व्यवसाय सुरू केला. या माध्यमातून त्यांनी अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला.

शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील महिला आर्थिकदृष्ट्या कमी सक्षम असतात. अलीकडच्या काळात परिस्थितीत बदल होत असला तरी खेड्यातील, आदिवासी भागातील महिला अजूनही सक्षम नसल्याचे जाणवते. एखादी स्वयंसेवी संघटना किंवा सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रोत्साहित केले तर खेड्यातील महिला पुढे सरसावतात. याची अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. बचत गटांच्या माध्यमातून झालेली क्रांती आपण अनुभवतो आहोत.


आपल्याकडे ग्रामीण भागात कृषीअर्थव्यवस्था आहे. या दृष्टीने विचार करून महिलांना सक्षम बनवण्यासाठी जोसेफिन सेल्वराज यांनी मधमाशी पालन व्यवसाय सुरू केला. सेल्वराज या "द विबिज नॅचरल बी फार्म‘च्या संस्थापक आहेत. मदुराई जिल्ह्यातील वाडीपट्टी तालुक्‍यात त्यांनी मधमाशी पालन व्यवसाय सुरू केला. या माध्यमातून महिलांना चांगल्या रीतीने रोजगार उपलब्ध होऊ शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे. "द विबिज नॅचरल बी फार्म‘ सुरू केले तेव्हा केवळ दहा पाळीव मधमाशा होत्या. त्या वेळी मधापासून आठ हजार रुपये मिळायचे. 2007 मध्ये नॅशनल हनी मिशनने संस्थेकडे मधाच्या सुमारे 62 बॉक्‍सची मागणी केली. ही जोसेफिनसाठी पहिली सर्वांत मोठी ऑर्डर होती. अत्यंत कमी कालावधीत जोसेफिनने हा व्यवसाय वाढविला आणि तो विस्तारत गेला.

आजघडीला मधमाशी पालन व्यवसाय हा केवळ जोसेफिनसाठी नाही, तर आदिवासी भागातील 50 महिलांना रोजगार देणारा ठरला आहे. या महिला पर्वतरांगात वसलेल्या ओडछत्ररम, मलाईयूर, इलापारा आणि सिरुमालैन या गावांतील रहिवासी आहेत. त्याशिवाय जोसेफिनने परिसरातील 300 महिलांना हा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहित केले आणि मदतही केली. त्यामुळे या महिला आता स्वावलंबी झाल्या असून मधमाशी पालन व्यवसायात पारंगत झाल्या आहेत.

नॅशनल हनी मिशनअंतर्गत 20 हजारांहून अधिक महिलांना या व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रत्येक कुटुंबाला मध मिळण्यासाठी त्याचे उत्पादन करावे, असे जोसेफिन यांना वाटते. रक्तशुद्धीसाठी मध खूप उपयुक्त असून सर्वसामान्यांपर्यंत तो पोचला पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे. मधाचे जास्तीत जास्त उत्पादन कसे करता येईल आणि मधमाशी पालन व्यवसायाबाबत अधिकाधिक जागृती कशी करता येईल, यासाठी त्या प्रयत्नशील असतात. कर्करोग आणि हृदयविकार यासारख्या गंभीर आजाराला दूर ठेवण्यासाठी मधासारखे दुसरे उपयुक्त औषध नाही, असे जोसेफिन म्हणतात.

जोसेफिन यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे स्थानिक महिलांच्या स्थितीत आमूलाग्र बदल झाला आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा झाल्याने पाल्यांना चांगले आणि दर्जेदार शिक्षण मिळणे अधिक सुलभ झाले आहे. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था सुधारावी आणि विकास व्हावा, या दृष्टीने जोसेफिनने रोजगार निर्मितीसाठी मधमाशी पालनसारख्या व्यवसायाला पुढे नेले आणि त्यास स्थानिकांचा विशेषत: महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जोसेफिन यांचा विवाह सेल्वराज यांच्याबरोबर विवाह झाला तेव्हा त्या 18 वर्षांच्या होत्या. जोसेफिनला उद्यमशिल बनविण्यात पतीचा मोठा वाटा होता. दुर्दैवाने 2012 मध्ये किरकोळ आजाराने जोसेफिनच्या पतीचा मृत्यू झाला. दुसरी धक्कादायक घटना म्हणजे त्यांनी आपली 17 वर्षांची मुलगी कर्करोगाने गमावली. आता त्यांचा मुलगा विजय हा आईच्या व्यवसायात हातभार लावतो. जोसेफिन यांचे बंधू रोस्सेऊ ब्रिटू हेही व्यवसायात मदत करतात. तमिळनाडू आणि केरळमध्ये सुमारे 6000 ठिकाणी मधमाशांची वसाहत उभारली असून त्यातून मधाचे उत्पादन घेतले जाते. त्यात तीन हजार वसाहती त्यांच्या स्वत:च्या आहेत. मधमाशी पालन व्यवसायाचे त्या मोफत प्रशिक्षण आणि माहिती देतात. महिन्याच्या दुसऱ्या रविवारी त्या मधमाशीपालनसंदर्भात महिलांशी संवाद साधतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com