पोलिसांकडून 83 वर्षांच्या एकाकी आजींना बर्थडे पार्टी!

पीटीआय
मंगळवार, 3 जानेवारी 2017

मुंबई- दोन अपत्ये अमेरिकेत राहतात.. एक नोकरीनिमित्त बंगळूरमध्ये राहतो.. वय ऐंशीच्या पुढे गेलेले.. अशा वयात त्या आजीबाईंना मध्य मुंबईतील वडाळा येथे एकटेच राहावे लागते.. आज सकाळी त्यांच्या दारावर ठकठक ऐकू आली म्हणून आजींनी दार उघडले.. तर दारात पोलिस उभे होते, त्यांच्या हातात होता बर्थडे केक!

वृद्ध महिला ललिता सुब्रमण्यम यांना आज हा सुखद अनुभव आला. मागील 25 वर्षांपासून त्या येथे एकट्या राहतात. पोलिसांकडील सुश्रुषा आणि संरक्षणाची आवश्यकता असणाऱ्या लोकांच्या यादीत सुब्रमण्यम यांचे नाव आहे.

कुटुंबीय काही ना काही कारणांनी दूर गेले असले तरी मुंबई पोलिसांनी त्यांना 'पोरके' होऊ दिले नाही. माटुंगा पोलिस त्यांना औषधे आणून देणे, बँकेतील कामे अशा गोष्टींसाठी मदत करतात. या आजींच्या मुलांपैकी कोणीच त्यांना 83व्या वाढदिवसानिमित्त भेटायला येणार नाही हे समजल्यावर पोलिसांनी त्यांना वाढदिवसाची अशी सुखद भेट द्यायचे ठरविले. 

माटुंगा पोलिस ठाण्याचे अधिकारी एक केक आणि पुष्पगुच्छ घेऊन सकाळी सुब्रमण्यम यांच्या घरी गेले. मागील वर्षी येथे पोलिस उपायुक्तपदी कार्यरत असणारे अशोक दुधे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी.एम. काकडे यांच्यासह इतर पोलिस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुब्रमण्यम यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. 
 
काही सुखद

पिंपरी - कौटुंबिक गरिबी, जबाबदाऱ्या आणि शैक्षणिक असुविधांमुळे ग्रामीण भागातील मुलींची शालेय गळती ठरलेलीच. या प्रतिकूल...

04.12 AM

सातारा - पदवीधर... ३९ वेळा सैन्य भरतीत अपयशी... कोणाचा डिप्लोमा, कोणाचा कोर्स, तर कोणी महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे... पण, नोकरी...

03.12 AM

पुणे - जिल्ह्यातील बाेरी बुद्रुक हे कायम दुष्काळ सोसणारे गाव. यावर शाश्वत उपाय शोधण्यासाठी गावशिवारातील काेरडे मळ्यातील...

02.15 AM