विवाहानंतर ‘पी. एचडी.’सह नऊ पदव्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

‘एमपीएससी’ परीक्षेतही राज्यात मिळविला चौथा क्रमांक

कापडणे - पाडळदे (ता. धुळे) येथील लेक व सावळदे (ता.शिरपूर) येथील सून प्रा. डॉ. संगीता महाजन यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ओबीसी वर्गातून चौथा क्रमांक मिळविला आहे. त्यांची जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत अधिव्याख्याता म्हणून निवड झाली आहे. प्रा. महाजन यांनी विवाहानंतर डी. फॉर्म, पदवी, एम.एस.डब्ल्यू, बीएड, एमएड, नेट दोनदा व पी. एचडी अशा नऊ पदव्या संपादित केल्या आहेत. तेरा पुस्तके व शोधनिबंधही त्यांच्या नावावर आहेत. सावित्रीच्या या लेकीने विवाहानंतर शिक्षणात एक विक्रमच केला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अधिव्याख्यातापदासाठी परीक्षा घेतली होती. त्यात ओबीसी वर्गातून प्रा. संगीता महाजन यांनी चौथा क्रमांक मिळविला आहे. प्रा. महाजन जळगाव येथील सदगुरू एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयात व्याख्यात्या आहेत.

प्रा. महाजन या पाडळदे येथील राजधर झुलाल महाजन यांच्या कन्या आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण कमलाबाई कन्याशाळेत झाले. बारावीनंतर विवाह झाला. पती राजेंद्र पाटील क्‍लासेसच्या माध्यमातून रोजगार उभारण्यासाठी जळगाव येथे स्थायिक झाले. त्यानंतर प्रा. महाजन यांनी त्यांच्या प्रेरणेतून शिक्षणाचा प्रवास सुरू केला. तो विविध उच्च पदव्या घेऊन आजही सुरू आहे. त्यांच्या या यशाबद्दल पाडळदेत समाधान व्यक्त होत आहे.

Web Title: After the marriage p.hed & nine degrees