टाकाऊ वस्तूंच्या कलाकृतींतून जागृती

Awareness in the artwork of waste products
Awareness in the artwork of waste products

वडाळा - स्वच्छ भारत अभियानांतर्गत नवोदित कलावंतांच्या सहकार्याने परळ पूर्वेकडील भोईवाडामधील भीमनगर येथे ग्रीन हॅबिट फाऊंडेशनच्या वतीने ग्रीन हॅबिट प्रदर्शन व कलामहोत्सव भरवण्यात आले आहे. प्रदर्शन व कलामहोत्सवाचे उद्‌घाटन शुक्रवारी (ता. २७) सायंकाळी ७ वाजता महाराष्ट्र रोजगार आघाडी अध्यक्ष चंद्रकांत जगताप, माजी नगरसेवक सुनील मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी नायगाव-वडाळा तालुका अध्यक्ष गौतम गायकवाड, ग्रीन हॅबिट फाऊंडेशनच्या संचालिका समता पांचाळ आदी उपस्थित होते. 

भीमनगर झोपडपट्टीतील स्थानिकांची मानसिकता व राहणीमान बदलावे यासाठी तेथील नागरिकांसोबत ग्रीन हॅबिट फाऊंडेशनने कलामहोत्सव हा कार्यक्रम राबविण्याचे ठरविले. लोखंड, दगड, कागद, प्लास्टिक, टायर, ताडपत्री आदी टाकाऊ वस्तूंपासून विविध कलाकृती साकारल्या आहेत. त्यात झाडे लावा, पाणी वाचवा, प्लास्टिकचा वापर टाळा, जल प्रदूषण टाळा, जलचर प्राण्यांना वाचवा, डासांची उत्पत्ती थांबवा, तुळशीची रोपे लावा, असे पर्यावरणाच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण संदेश देणाऱ्या कलाकृती साकारण्यात आल्या. नागरिकांनी बनवलेल्या या वस्तूंचे भोईवाडा येथे प्रदर्शन भरवण्यात आले असून, हे प्रदर्शन कलाप्रेमी व निसर्ग प्रेमींसाठी १ मेपर्यंत खुले ठेवले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com