धुळ्यात शेतकऱ्याने  स्वखर्चाने बांधला बंधारा

धुळ्यात शेतकऱ्याने  स्वखर्चाने बांधला बंधारा

धुळे - जमिनी विक्री व इतर व्यवसाय सांभाळून येथील मुकुंद कोळवले यांनी शेतीची आवड जोपासली आहे. भाजीपाला व रब्बी हंगामाची चांगली शेतीही ते करू लागले आहेत. या शेतीविषयीच्या आवडीतून कोळवले यांनी स्वखर्च आणि लोकसहभाग यातून सुमारे २३ लाख रुपये खर्चाचा बंधारा धुळे शहरालगतच्या सिंधी नाल्यावर उभारला असून, त्याचा लाभ परिसरातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होत आहे. 

हा बंधारा पालिका क्षेत्रात दिसत असला तरी शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत असल्याने धुळे जिल्हा प्रशासनातील जलयुक्त शिवार अभियान समितीचे तालुकाध्यक्ष तथा प्रांत गणेश मिसाळ यांनी या कामास मंजुरी दिली होती. पाणी वाहून जाऊ नये, नाल्यावर अतिक्रमण होऊ नये आणि आपल्यासह धुळे तालुक्‍यातील इतर शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळावा, यासाठी कोळवले यांनी प्रशासनाला या बंधाऱ्याबात साकडे घातले होते. 

७० एकर शेतीला या बंधाऱ्याचा लाभ होतो. धुळे शहरापासून सुमारे सहा किलोमीटर लांब अंतरावर हा बंधारा आहे. लळींग प्रकल्पाकडून हा सिंधी नाला धुळे शहराकडे येतो. तो पुढे पांझरा नदीला मिळतो. या बंधाऱ्यास लागलीच पाटबंधारे विभागानेही मंजुरी दिली होती. जशी मंजुरी मिळाली, तसे कामही दुसऱ्याच दिवशी सुरू झाले. त्याचे काम पूर्ण झाले आहे.  सुमारे ५५० कुटुंबांना पिण्याचे पाणी मिळू शकेल, यासाठी जलकुंभही कोळवले यांनी या बंधाऱ्यालगत उभारला आहे. हा बंधारा जलयुक्त शिवार अभियानात घेतला जावा, त्याचे मॉडेल राज्यभरात लागू करून कार्यवाही हाती घेतली जावी, अशी मागणी कोळवले यांनी राज्याचे जलसंधारणमंत्री राम शिंदे यांच्याकडेही केली आहे.  कोळवले यांची २५ एकर शेती धुळे शहरालगत व सावळदे शिवारात आहे. यंदा त्यांनी दोन एकरात गहू घेतला. तर सुमारे १० एकरांत भेंडी, चवळी, गवार आदींची शेती ते करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com