आगीत भस्मसात झालेला संसार पुन्हा राहिला उभा!

family
family

येवला : वाईबोथी येथील विठ्ठल जाधव यांच्यावर नियतीने अशी वेळ आणली की क्षणार्धात आख्ख्या संसाराची राखरांगोळी झाली. संसारोपयोगी एक साहित्यच काय पण घरदार, कपडे, वस्तू,धान्य सगळे जळून खाक झाले. मात्र या संकटाच्या काळात पंचायत समितीचे उपसभापती रुपचंद भागवत यांनी जाधव कुटुंबाला स्वखर्चातून किराण्यासह भांडी व सर्व संसारोपयोगी वस्तू देऊन मोठा आधार दिला आहे.

विठ्ठल जाधव यांचे घरआगीत जाळून खाक होत फक्त राहिले होते ते अंगावरचे कपडे. घरची परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने मोठा यक्षप्रश्न या कुटुंबापुढे असताना गेल्या २ दिवसात प्रशासनही जाधव कुटुंबाकडे फिरकले नाहीत, कुठला पंचनामा महसूल विभागाने अद्याप केला नसून पंचायत समितीचे उपसभापती भागवत यांनी घटनास्थळाला भेय देऊन जाधव कुटुंबाचे सांत्वन करून मदत देण्याचे जाहीर आश्वासन दिले होते.

जाधव कुटुंबाची झालेली परिस्थिती बघून भागवत यांनी 'काल सांगितले, आज दिले' याचा प्रत्यय प्रत्यक्षात आणून दिला. भागवत आज गुरुवारी प्रत्यक्ष मदतीचे सामान घेऊनच जाधव कुटुंबकडे पोहोचले. उपसभापती भागवत यांनी आपले बंधू श्री नारायनगिरी महाराज फाउंडेशचे अध्यक्ष विष्णू भागवत यांच्या कानावर घटनेची माहिती दिली. उद्योजक विष्णू भागवत यांनीही तात्काळ मदत देण्याचे सांगितल्यानंतर आज भागवत यांनी स्वखर्चाने जाधव कुटुंबासाठी प्राथमिक संसारउपयोगी वस्तु-धान्य किराणा यात एक क्विंटल बाजरी, एक  क्विंटल गहू, १५ किलो तांदूळ, १० किलो तूरडाळ, ५ लिटर गोड्तेल, २ किलो हरभरा डाळ, २ किलो शेंगदाणे, 2 किलो साखर, १ किलो बेसनपीठ, १ किलो गुळ, १ किलो शाबूदाना, चहा पावडर, मसला, हळद, मिरची, जिरे, साबण, निरमा पावडर, खोबरेल तेल, मिठपुड्या, तसेच भांडे हंडा, कळशी, ३ पातीले, कढ़ाई, तवा, ५ ताट, ४ तांबे, वाट्या, प्लेट, ग्लास, डबे, बादली, जग, तेल किटली, खलबत्ता, पोळीपाट, लाटणे, विळी, उचटनी, झारा, भातोडी, सांडशी, मोठा चमचा, ५ लिटरचा कुक्कर, चाळणी, ६ कपबश, चाळण, चमचे, देव तांब्या , ताट याप्रमाणे वस्तु देवून जाधव कुटुंबास धीर दिला.यावेळी विलास भागवत ,मीननाथ जाधव,समाधान चव्हाण, ज्ञानेश्वर भागवत, सचिन भागवत, अरुण भागवत व ग्रामस्थ उपस्थित होते.

"सामाजिक बांधीलकीतून गोरगरीब व पीडितांना मदत देण्यासाठी आम्ही नेहमीच आनंदी आहोत.तालुक्यात कुठल्याही गरीब,तळागाळातील सर्वसामान्यवर आपत्ती आल्यानंतर भागवत कटुंब व श्री नारायनगिरी महाराज फाउंडेशनच्या वतीने मदत देत आलो असून आज जाधव कुटुंबाला ही मदत देताना मोठे समाधान झाले, असे पंचायत समितीचे उपसभापती रुपचंद भागवत यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com