ऐकू येत नसूनही चुकत नाही त्यांचा ठेका 

- नीला शर्मा 
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

कर्णबधिर असूनही त्या मुली ठेक्‍याशी उत्तम प्रकारे जुळवून घेत नृत्याचा मनसोक्त आनंद घेतात. त्यांचं परस्परांशी असलेलं सामंजस्य विलक्षण आहे. 

पुण्यातील रेड क्रॉस संस्थेतील कर्णबधिर मुली कथकसारख्या शास्त्रीय नृत्यात रमतात. ऐकू येत नसलं तरी ठेक्‍यातला त्यांचा बिनचूकपणा वाखाणण्याजोगा असतो. त्यांना पंधरा वर्षांपासून विनामूल्य प्रशिक्षण देणाऱ्या शिल्पा दातार आपल्या या विद्यार्थिनींचं कौशल्य पाहून धन्यता व्यक्त करतात. 

कर्णबधिर असूनही त्या मुली ठेक्‍याशी उत्तम प्रकारे जुळवून घेत नृत्याचा मनसोक्त आनंद घेतात. त्यांचं परस्परांशी असलेलं सामंजस्य विलक्षण आहे. 

पुण्यातील रेड क्रॉस संस्थेतील कर्णबधिर मुली कथकसारख्या शास्त्रीय नृत्यात रमतात. ऐकू येत नसलं तरी ठेक्‍यातला त्यांचा बिनचूकपणा वाखाणण्याजोगा असतो. त्यांना पंधरा वर्षांपासून विनामूल्य प्रशिक्षण देणाऱ्या शिल्पा दातार आपल्या या विद्यार्थिनींचं कौशल्य पाहून धन्यता व्यक्त करतात. 

शिल्पाताईंची मुलगी गार्गी पाचवीत असल्यापासून या मुलींच्या प्रशिक्षणात सहभागी होत राहिली आहे. "आईकडून स्वत: घेतलेले धडे कर्णबधिर मैत्रिणींना शिकवताना आणखी पक्के होत गेले,' असं ती नमूद करते. सात वर्षांच्या सहवासानंतर ती आता मुंबईत पुढील शिक्षणासाठी असते. वेळ मिळेल तेव्हा ती इथं आली, की हमखास या मैत्रिणींना भेटायला जाते. त्यांनी गिरवलेले नवे पाठ कोणते, ते त्यांच्याचकडून जाणून घ्यायची मोठी उत्सुकता तिला असते. अलीकडेच दिवाळीच्या सुटीत झालेल्या एका कार्यक्रमात गार्गीनं त्यांची प्रगती पाहून आनंद व्यक्त केला. 
सामाजिक कार्याची आवड असल्यानं गार्गीनं अकरावीत असताना तीस कर्णबधिर मुलांच्या शारीरिक- मानसिक आरोग्यविकासासाठी महिन्याभराचा एक प्रकल्प हाती घेतला होता. त्यासाठी त्यांना पौष्टिक खाऊ रोज दिला. नाट्य व नृत्याचा समावेश असलेला कृतिकार्यक्रम घेतला, त्यामुळे तर तिची गट्टी या मुलींशी जास्तच जमली. 

ऐकता- बोलता येत नसल्यानं विचार व भावना व्यक्त करण्यात मागं पडणाऱ्या मुली कृतिकार्यक्रमामुळे खुलू लागल्या. नेहमीच्या हस्तलिपीला आता कथक नृत्यात वापरल्या जाणाऱ्या मुद्रा व हस्तकांची जोड मिळाली. कलात्मक अभिव्यक्ती साधू लागल्यानं आत्मविश्वास वाढला. 
या साऱ्या मैत्रिणी आपापसांत मस्त गप्पा करतात. नृत्य करताना ठेका त्यांना ऐकू येत नाही; पण मार्गदर्शक ताईंनी केलेल्या खुणा पाहून त्या भराभर बदल करतात. त्यांनी नेमकेपणानं साधलेली सम पाहून अनेकांना आश्‍चर्य वाटतं. राधा- कृष्णाच्या जीवनप्रसंगांवर आधारित नृत्य करताना आपणही कथा सांगू शकतो आणि तीही अभिजात नृत्याच्या भाषेतून, याचं आगळंवेगळं समाधान या मुलींच्या मनात भरून असतं. 

टॅग्स

काही सुखद

एखादी कला, अावड जर व्यवसायात बदलता अाली तर स्वतःसह इतरांसाठीही रोजगार निर्मिती करण्यास मदतगार ठरते, हे अकोला शहरातील नारायणी पवार...

10.00 AM

कात्रज - दहीहंडीसाठी होणारा खर्च विधायक कार्याकडे वळविण्याच्या हेतूने कात्रज येथील शिवशंभू प्रतिष्ठानने वेल्हा तालुक्‍यातील...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017

पिंपरी: सध्याच्या तरुणाईमध्ये अखंड ऊर्जा आहे. तरुणांनी एकत्र येऊन विधायक कामाचा वसा घेतला, तर ते नक्कीच सामाजिक कार्याचा मोठा...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017