भरकटलेल्यांना अखेर गवसले ‘रिमांड होम’!

सुनील शेडगे
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

नागठाणे - युवकांची सतर्कता अन्‌ त्याला लाभलेल्या पोलिसांच्या तत्परतेची सोबत यामुळे भरकटलेल्या दोन अल्पवयीन मुलांना पुन्हा एकदा  ‘रिमांड होम’चा रस्ता गवसला.

नागठाणे - युवकांची सतर्कता अन्‌ त्याला लाभलेल्या पोलिसांच्या तत्परतेची सोबत यामुळे भरकटलेल्या दोन अल्पवयीन मुलांना पुन्हा एकदा  ‘रिमांड होम’चा रस्ता गवसला.

अधिक पवार अन्‌ दीपक पवार हे बांबवडे (ता. पाटण) गावचे युवक. आपल्या कामासाठी ते दोघे सातारा येथे आले होते. दुचाकीवरून गावी परतत असताना त्यांना यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या परिसरात दोन अल्पवयीन मुले गोंधळलेल्या अवस्थेत आढळली. या मुलांच्या पाठीवर शाळेची सॅक अन्‌ हातात कपड्यांची पिशवी होती. अधिक व दीपक यांनी थांबून या दोघांची चौकशी केली. आम्ही जखीणवाडी (ता. कऱ्हाड) येथे मामाकडे निघालो असल्याचे या मुलांनी त्यांना सांगितले. त्यानंतर युवकांनी आम्ही तुम्हाला मामाकडे सोडतो, असे सांगून मुलांना आपल्यासोबत घेतले. प्रवासादरम्यान मुलांची विचारपूस केली असता त्यांच्याकडून विसंगत उत्तरे मिळू लागली. हा प्रकार लक्षात येताच युवकांनी मुलांना बोरगाव येथे पोलिस ठाण्यात आणले. तिथे सहायक पोलिस निरीक्षक मयूर वैरागकर यांना याविषयीची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी जखीणवाडी येथील पोलिस पाटलांच्या मदतीने एका मुलाच्या मामाशी तत्काळ संपर्क साधला. मामांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसही चक्रावून गेले. तो मुलगा अनाथ असून सध्या सातारा इथे ‘रिमांड होम’मध्ये राहात असल्याचे त्यांनी नमूद केले. अखेर पोलिसांनी तेथील व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता मुले तिथून पळाल्याचे स्पष्ट झाले. या मुलांबाबतची माहिती व्यवस्थापनाला देण्यात आली. मग मुलांची रवानगी पुन्हा सातारा इथे ‘रिमांड होम’मध्ये करण्यात आली.

विविध यंत्रणांशी संपर्क 
या घटनाक्रमात अधिक पवार अन्‌ दीपक पवार यांची सतर्कता फलदायी ठरली. सहायक पोलिस निरीक्षक मयूर वैरागकर अन्‌ त्यांचे सहकारी सहायक फौजदार अशोक हजारे, मानसिंग शिंदे, वंदना गायसमुद्रे यांनीही सातत्याने विविध यंत्रणांशी संपर्क साधून मुलांना सुखरूप ‘रिमांड होम’मध्ये पाठवले. संबंधितांच्या या संवेदनशीलतेचे विशेष कौतुक होत आहे.

काही सुखद

उपराजधानीत १७ जणांच्या दानातून २६ जणांचे वाचले प्राण नागपूर - दोन वर्षांपूर्वीची घटना. पाण्याचा बंब पेटविताना चेहरा आणि हात...

रविवार, 13 ऑगस्ट 2017

सातारा जिल्ह्यातील उरमोडी धरणापासून दोन किलोमीटर अंतरावर शिंदेवाडी हे सुमारे ३०० लोकसंख्या असलेले गाव. उरमोडी धरण जवळ असले तरी...

रविवार, 13 ऑगस्ट 2017

इगतपुरी - तालुक्‍यातील आदिवासी भागातील नांदूरवैद्य व अस्वली स्टेशन गावातील जिल्हा परिषद शाळा पाच दशकांपासून अविरतपणे...

शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017