श्रमदानाने पालटले कोरोची ओढ्याचे रूप

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 मे 2017

इचलकरंजी : वीर सेवा दल आणि सकाळ तनिष्कातर्फे आज कोरोची (ता. हातकणंगले) येथील ओढ्याची स्वच्छता करण्यात आली. गावालगतच असलेल्या आणि निसर्गरम्य पार्श्‍वभूमी असलेल्या या ओढ्याची अवस्था दयनीय झाली होती. मात्र श्रमदानाने या ओढ्याचे रूप आज पूर्णपणे पालटून गेले.

इचलकरंजी : वीर सेवा दल आणि सकाळ तनिष्कातर्फे आज कोरोची (ता. हातकणंगले) येथील ओढ्याची स्वच्छता करण्यात आली. गावालगतच असलेल्या आणि निसर्गरम्य पार्श्‍वभूमी असलेल्या या ओढ्याची अवस्था दयनीय झाली होती. मात्र श्रमदानाने या ओढ्याचे रूप आज पूर्णपणे पालटून गेले.

ओढ्याच्या सुरवातीच्या भागाची आज पूर्णपणे स्वच्छता झाली. यानंतर टप्याटप्याने ओढ्यालगत असलेल्या स्मशानभूमी भोवती वृक्षारोपण आणि ठिकठिकाणी बंधारे घालून पाणी अडविण्यात येणार आहे. यामुळे कोरोची आणि परिसरातील शेतकऱ्यांना या ओढ्यातील पाण्याचा फायदा होणार आहे.

वीर सेवा दल ही सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी दक्षिण भारत जैन सभेच्या अंतर्गत चालणारी संघटना आहे. या संघटनेतर्फे विविध सामाजिक आणि राष्ट्रीय कामे केली जातात. गेल्यावर्षी या संघटनेतर्फे अब्दुललाट आणि चोकाक येथील तळ्याचे काम करण्यात आले होते. या वर्षी पहिल्या टप्प्यात कोरोची येथील ओढा साफसफाई व रूंदीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कोरोची येथील जिल्हा परिषद माजी सदस्य सौ. प्रेमला पाटील यांच्या नेतृत्वाखालील स्वामिनी तनिष्का गट सक्रिय आहे. या गटाच्यावतीनेही यापूर्वीच या ओढ्याच्या कामाबाबत सर्व्हे झाला होता. त्यामुळे दोन्ही संघटनेच्या वतीने आजही मोहीम राबविण्यात आली.
उद्‌घाटनाचा कोणताही औपचारिक कार्यक्रम न घेता पहाटे साडेसहापासूनच युवक आणि तनिष्का सदस्यांनी स्वच्छता मोहिमेस प्रारंभ केला. गावालगतच ओढ्याजवळ असलेल्या स्मशानभूमीची आणि परिसराची दयनीय अवस्था झाली होती. अत्यसंस्कारानंतर टाकलेले साहित्य, गावकऱ्यांनी नको असलेले टाकलेले विविध वस्तू आणि झाडे झुडपे यामुळे हा परिसर अत्यंत गलिच्छ झाला होता. सुरवातीला याच परिसराची स्वच्छता करण्यात आली. काही तासातच श्रमदानाने संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. त्यानंतर आलेल्या जेसीबीच्या सहाय्याने ओढ्याच्या पात्राची स्वच्छता सुरू झाली. या वेळी जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी संजय सुतार यांची प्रमुख उपस्थिती होती. या मोहिमेला कोरोची ग्रामपंचायतीनेही सहकार्य केले. ग्रामपंचायतीने पाठविलेल्या ट्रॅक्‍टर ट्रॉलीद्वारे संपूर्ण कचरा ओढ्यातून हलविण्यात आला. युवक, महिला आणि बालचमूंच्या उत्साही कामाने या ओढ्याच्या सुरवातीचा भाग आज चकचकीत बनला. या ठिकाणी वृक्षारोपणाबरोबरच परिसराचे सौंदर्य वाढविण्यासाठी विविध कामे करण्याचा निर्णय सकाळ तनिष्का गट आणि वीर सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. "सकाळ'चे बातमीदार संजय खूळ, वितरण विभागाचे मिलिंद फुले यांनी स्वागत केले.

या मोहिमेत भाग घेतलेले सहयोगी ः
स्वामिनी तनिष्का गट- सीमा पाटील, गीता साळुंखे, पुष्पमाला मोरे, प्रेमला पाटील, वैशाली दुर्गाडे, पूनम पाटील, सुवर्णा नागावे, मनीषा पाटील, संगीता पाटील
अजित पाटील वीर सेवा दल जिल्हाप्रमुख, विजय बरगाले जिल्हा सचिव, स्वप्नील उपाध्ये, सौरभ पाटील, वीर सेवा दल सदस्य ः शीतल पाटील, विपुल पाटील, बाहुबली उपाध्ये, जितेंद्र चौगुले, सुदर्शन चौगुले, विरेंद्र कुरूंदवाडे, उदय बरगाले, भरत पाटील, बाहुबली पाटील, श्रेणीक पाटील, सौरभ उपाध्ये, सूरज पाटील, अमोल पाटील, अभय पाटील, संकेत पाटील, सौरभ भमाणे, प्रणव नाईक, अक्षय पाटील, नीलेश चावरे, गोमटेश मगदूम, अमोल उपाध्ये, विजय सुतार, अनिल गडकरी, जलदकुमार पाटील, विजय गिरमल, अभयकुमार पाटील, सुदर्शन बुद्रुक.
पार्श्‍व युवा मंचचे सदस्य ः सौरभ पाटील, दीपक पाटील, रमेश पाटील, विशाल पाटील, सूरज पाटील, सुमित पाटील, प्रणव जाधव, अशोक पाटील, राकेश कुरूंदवाडे, विलास दुरूगडे, अमोल उपाध्ये, सचिन पाटील, दीपक कोले, संतोष मगदूम. जयभद्र पाठशाळा ः पार्श्‍व पाटील, अभिषेक प्रधाने, अभिजित बरगाले, अविष्कार बरगाले, अनुष्का बरगाले, अनिकेत बरगाले, संदीप कुरुंदवाडे, सुजल कुरूंदवाडे, आदित्य प्रधाने, विनोद कुडचे, अविनाश माणगावे, अक्षय अंकलगे. याचबरोबर वीर सेवा दलाच्या हुपरी, कबनूर, किणी, रुई, चोकाक, कुंभोज, शिरदवाड, इचलकरंजी, कुरुंदवाड या शाखेतील स्वयंसेवकांचा या मोहिमेत सहभाग राहिला.
 

स्मशानभूमीची स्वच्छता
याचवेळी तनिष्काच्या महिलांनी स्मशानभूमी आणि त्या परिसराची स्वच्छता केली. सर्व दगड एकत्र करून त्याचा बंधाराही नजीकच्या ठिकाणी घालण्यात आला. स्मशानभूमीमध्ये येऊन स्वच्छता मोहीम करण्याची महिलांची ही पहिलीच वेळ होती. अतिशय उत्साहाने सकाळ तनिष्का गटाच्या सदस्यांनी हे काम केले. तनिष्का गटाच्या अध्यक्षा प्रेमला पाटील यांनी नाष्टा व चहाची सोय केली होती.