लग्नाच्या वाढदिवशी 'वस्त्रदान' चळवळ

pali
pali

पाली : अनेक जण अापल्या लग्नाचा पहिला वाढदिवस पार्टी करुन किंवा कुठे तरी फिरायला जावून साजरा करतात. परंतू याला अपवाद ठरले ते सुधागड तालुक्यातील राजिप शाळा पायरीचीवाडीचे शिक्षक कुणाल पवार. त्यांनी लग्नाचा पहिला वाढदिवस रविवारी (ता.१२) वाकणवाडी आदिवासीवाडी येथे गरीब,गरजू आदिवासी बांधवाना कपडे देवून व लहानग्यांना खाऊचे वाटप करुन साजरा केला.

कुणाल पवार यांनी अापले जुने पण चांगले सुस्थितीतील असलेले कपडे त्यामध्ये ८जीन्स,६ शर्ट ,२ टी-शर्ट तसेच त्याचबरोबर नवीन 3 शर्टपीस व २ साड्या असे कपडे अादिवासी बांधवांना वाटप केले. येथील सर्व लहान मुलांना खाऊचे वाटप केले. कुणाल पवार यांनी मागील वर्षी अापल्या लग्नात अनावश्यक रुढ परंपरांना व खर्चाला फाटा देवून सपत्नीक अवयव दानाचा संकल्प केला होता. अाणि अवयवदानासाठी जनजागृती करण्याचे पाऊल उचलेले अाहे. मागील महिन्यात अापल्या वाढदिवशी रक्तदान करुन प्रत्येक वाढदिवशी रक्तदान करण्याचा संकल्प केला आहे. अशा प्रकारे अापल्या अायुष्यातील महत्वाच्या दिवशी त्यांनी समाजोपयोगी व जनजागृतीपर उपक्रम करुन नवा अादर्श ठेवला अाहे.

अशा छोटया - छोटया उपक्रमांतून सामाजिक बांधिलकी जपण्याचा माझा छोटासा प्रयत्न. असतो आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. ही त्या मागची भूमिका व समाजाने मला काय दिले यापेक्षा मी समाजासाठी किंबहुना देशासाठी काय करु शकतो? हा त्यामागचा विचार. आपण सर्वजण या सामाजिक चळवळीत सहभागी होऊन खारीचा वाटा ऊचलुया.
- कुणाल पवार, प्राथमिक शिक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com