घराला आधार देत करिअरला दिशा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

ब्यूटीपार्लरमध्ये काम करत संध्याला ८० टक्के

कोल्हापूर - प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची जिद्द घेऊन संध्याकिरण नितीन पोवार या मुलीने ब्यूटीपार्लरचे प्रशिक्षण घेतले आणि दिवसाला सहा तास काम अन्‌ तीन तास अभ्यास, अशी कसरत नेटाने सांभाळली. त्याचे फलित म्हणून इयत्ता बारावीच्या परीक्षेत संध्याकिरण ८० टक्के गुण मिळवून कला शाखेत उत्तीर्ण झाली. जिद्दीच्या बळावर तिने अभ्यास सांभाळला, नोकरी सांभाळली, घराला आधार दिला, त्याचबरोबर स्वतःच्या उज्ज्वल भवितव्याची वाट स्वतःच सुखकर केली. तिच्या या यशाचा आनंद इतरांचा आत्मविश्‍वास दृढ करणारा ठरला आहे. 

संध्याकिरणचे वडील खासगी क्षेत्रात काम करतात, तर आई गृहिणी आहे. लहान भाऊ शालेय शिक्षण घेतो. यामुळे केवळ वडिलांच्या पगारावर घर चालणार नाही, याची समज संध्याकिरणला इयत्ता दहावीतच आली. त्यामुळे चिकाटीने अभ्यास करून ती दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाली. यानंतर हेअर ॲण्ड ब्यूटी कन्सेप्ट दाभोळकर कॉर्नर येथे सयाजी झुंजारराव यांच्या मार्गदर्शनाखाली ब्यूटीपार्लरचे अद्ययावत प्रशिक्षण घेतले. तिथेच नोकरीही करू लागली. त्यासोबत महाराष्ट्र हायस्कूल ज्युनिअर कॉलेजमध्ये ११ वी, १२ वीचे शिक्षण घेतले. 

सकाळी कॉलेज अन्‌ रात्री साडेनऊपर्यंत पार्लरचे काम करीत असल्यामुळे ती थकून जात होती. तरीही घरी जाऊन पुन्हा आईला मदत आणि रात्री झोपताना अभ्यास, असे सत्र तिने वर्षभर सुरू ठेवले.

या परीक्षेत ८० टक्के गुण मिळविले आहेत. त्याच जिद्दीने पार्लरच्या कामाने मला शिकण्याचे बळ दिले आहे. त्यामुळे याच क्षेत्रात करिअर करायचे आहे. त्यासाठी आधुनिक प्रशिक्षण घ्यायचे आहे. त्यासोबत पदवीही घ्यायची आहे.
- संध्याकिरण पोवार