‘प्लेन बॉईज’चे सामाजिक दातृत्व ...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जुलै 2017

कोल्हापूर - रस्त्यावर थांबायचे. एकाद्या मोपेडच्या शीटवर केक ठेवायचा. फटाक्‍याची माळ लावायची. केक कापायचा आणि पार्टीला जायचे. तरुणांचे वाढ दिवस साजरा करण्याचे हे ‘फ्याड’  शहरातील गल्लीबोळात दिसत आहे. पण त्याला अपवाद ठरले आहेत, प्लेन बॉईजचे ‘ते’ आठ जण. प्रत्येक जण त्यांचा वाढदिवस वृद्धाश्रम, गरजूंना मदत, दानधर्म, वृक्षारोपण, शैक्षणिक साहित्य वाटप, जुन्या वस्तू दुरुस्त करून गरजुंना देण्याचे काम करून आपला वाढदिवस साजरा करतात. स्वतःचा पार्ट टाईम जॉब सांभाळून एमपीएससीचा अभ्यास करीत तेही माणूसकी जपत आहेत.

शिवाजी विद्यापीठाच्या विमान (प्लेन) इमारतीत अभ्यास करण्याच्या निमित्ताने त्यांनी ओळख झाली. सर्वांचेच एक ध्येय होते एमपीएससी पूर्ण करायची. त्यांनी एक ग्रुप तयार केला. त्याला नाव दिले. ‘प्लेन बॉईज’. सर्वांना अधिकारी व्हायचं आहे. पण आर्थिक परस्थिती नसल्यामुळे त्यांना उचित ध्येयापर्यंत पोहचण्यात अनेक अडथळे येत आहे. तरीही त्यांनी जिद्द सोडलेली नाही. यातील एक निखिल आनंदराव साळोखे. ट्रॉफी तयार करण्याच्या दुकानात तो काम करतो. सकाळी सहा ते दहा ही त्याची ‘प्लेन’ मध्ये अभ्यास करण्याचा वेळ. त्यानंतर ट्रॉफीच्या दुकानात कामाला यायचे आणि सहापर्यंत तेथे थांबायचे. या नोकरीतून मिळणाऱ्या खर्चातून स्वतःचा आणि अभ्यासासाठीचा खर्च पूर्ण करायचा. दुसरा महादेव पाटील. आता तो कॉन्स्टेबल म्हणून नोकरीस लागला आहे. तरीही तो प्लेन बॉईजमध्ये आजही सक्रीय असतो. अमोल कांबळे रत्नागिरी तहसिल कार्यालयात लिपिक म्हणून नोकरी लागला आहे. तरीही त्याला एमपीएससी पूर्ण करायची आहे. राहूल पाटील सध्या मुंबईतील एका बॅंकेत नोकरी करीत आहे. स्वप्नील गावडे आणि सचिन गावडे दोघे भाऊ त्यांनाही ‘पीएसआय’ व्हायचं आहे. अर्जुन कांबळे मोरेवाडीतील तोही ‘एमपीएससी’चा 

अभ्यास करीत आहे. अजिंक्‍य पाटील हा पोलिस कॉन्स्टेबल आहे. या सर्वांची सध्या राहण्याची ठिकाणे  वेगवेगळी असली तरीही त्यांना एमपीएससी पूर्ण करून अधिकारी व्हायचे आहे. 

‘महाराष्ट्र’ म्हणून व्हॉट्‌स ॲप ग्रुप तयार केला आहे. ते सर्वांच्या संपर्कात आहेत. त्यातील प्रत्येकाचा वाढदिवस ते  वृद्धाश्रमात जेवण  देवून, वृक्षारोपण करून साजरा करतात. वाजागाजा न करता कोणाच्या घरी नवीन टीव्ही आणला तर जुना स्वतःकडे घेतात. तो दुरुस्त करतात आणि   गरजुंना देतात. ज्या मुलांना शैक्षणिक साहित्यच नाही, त्यांच्यासाठी ते पदरमोड करून खर्च करतात. केवळ वाढदिवसा दिवशीच नाही तर इतर वेळी सुद्धा ‘प्लेन बॉईज’ म्हणून माणुसकी जपत आहेत. सामाजिक कामाची प्रसिद्धी नको, फकत माणुसकी जपायची आहे एवढंच ते सांगतात.