लातुरात गणेशोत्सवानिमित्त वृक्ष संगोपनाचा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

लातूर - गणेशोत्सवानिमित्ताने येथील लातूर वृक्ष चळवळीअंतर्गत अनेक शैक्षणिक, सामाजिक संस्थांना झाडे दत्तक घेऊन संगोपन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. यात येथील यश ॲकॅडमीच्या २५० विद्यार्थ्यांनी गणेश चतुर्थीचे औचित्य साधून वृक्षसंगोपन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. 

आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगी असे लिंबू, कडीपत्ता व विविध फुलांच्या झाडांचे विद्यार्थ्यांनी संगोपन करण्याची जबाबदारी घेतली. विद्यार्थ्यांना वृक्ष संगोपन प्रतिज्ञा देण्यात आली. प्रत्येक मुलाला वृक्षासोबत राष्ट्रीय महापुरुषांचे चरित्र पुस्तक भेट देण्यात आले. एकूण २५० विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. 

ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांना खेळाचे वाढीव गुण प्रोत्साहनपर दिले जातात त्याप्रमाणे वर्षभरात जेवढे विद्यार्थी वृक्षांचे संगोपन व्यवस्थित करतील त्यांनादेखील प्रोत्साहनपर वाढीव गुण देण्यात यावे, अशी मागणी या वेळी लातूर वृक्ष चळवळीतर्फे करण्यात आली. या विषयी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना पत्र पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. या उपक्रमासाठी यश ॲकॅडमीच्या संचालक पल्लवी कुलकर्णी यांनी पुढाकार घेतला. या वेळी लातूर वृक्षचे डॉ. अभय कदम, सुपर्ण जगताप, नगरसेवक इम्रान सय्यद, क्रीडा अधिकारी जयराज मुंढे, यश कुलकर्णी, कृष्णकुमार बांगड उपस्थित होते.