आदिवासी पाड्यांवर राहून लोकांमध्ये केली जागृती

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 नोव्हेंबर 2016

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातून 2007 मध्ये बीएएमएसचे शिक्षण पूर्ण करताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे झालेल्या परीक्षेत उत्तीर्ण होत माझी उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झाली. जळगाव जिल्हा परिषदेत परिविक्षाधीन कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर माझी मुंबई येथे मंत्रालयातील पाणीपुरवठा व स्वच्छता विभागात ह्युमन रिसोर्स विभागाच्या (एचआरडी) सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्राची जबाबदारी माझ्यावर होती.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातून 2007 मध्ये बीएएमएसचे शिक्षण पूर्ण करताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे झालेल्या परीक्षेत उत्तीर्ण होत माझी उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झाली. जळगाव जिल्हा परिषदेत परिविक्षाधीन कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर माझी मुंबई येथे मंत्रालयातील पाणीपुरवठा व स्वच्छता विभागात ह्युमन रिसोर्स विभागाच्या (एचआरडी) सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्राची जबाबदारी माझ्यावर होती. महाराष्ट्रात निर्मलग्राम अभियान व हागणदारीमुक्त गाव योजनांसंदर्भात गावागावांमध्ये जाऊन योजनांची माहिती देणे, उघड्यावरील प्रातःविधीचे दुष्परिणाम सांगणे, निर्मलग्राम योजनेचे फायदे सांगणे ही जबाबदारी पार पाडत असताना धुळे व नंदुरबार जिल्ह्यात या योजनांसंबंधीची माहिती देण्यासाठी गेले. काही गावे अतिशय दुर्गम भागांमध्ये होती. यामुळे थेट आदिवासी पाड्यांवर दोन दिवस मुक्काम करून या लोकांमध्ये जागृती करीत त्यांना यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले.
 

(शब्दांकन - कुणाल संत)