भूकमुक्त भारतासाठी जयहिंद फूड बँकेचा पुढाकार 

भूकमुक्त भारतासाठी जयहिंद फूड बँकेचा पुढाकार 

सोलापूर : सप्टेंबर 2013 मध्ये येथील एका कार्यक्रमात अन्न शिल्लक राहिले होते. त्याची खबर मिळताच सतीश तमशेट्टी त्या ठिकाणी गेले. तेथील 400 ते 500 जणांना पुरेल इतके अन्न त्यांनी गरजूंना वाटले. तेव्हापासून जयहिंद फूड बॅंकेचे कार्य चालू झाले. सध्या सव्वाशेच्या आसपास आणि पोलिस बॉइज, एसके फाउंडेशन, शिवशाही प्रतिष्ठान, वीरभद्र बहुउद्देशीय सामाजिक संस्था, सिद्धेश्वर तरुण मंडळ, शिवशक्ती तरुण मंडळ, शिवराम प्रतिष्ठान अशी विविध संस्था व मंडळे या कार्यात सहभागी झाली आहेत. 

अन्नपूर्णा फाउंडेशन संचलित जयहिंद फूड बॅंकेची सुरवात सोलापुरातून झाली; त्याचे कार्य आता हत्तूर, सोरेगाव, बाळे, तुळजापूर, नळदुर्ग, कराड, लातूर कर्नाटकमधील झळकी इत्यादी ठिकाणी पसरले आहे. लवकरच उस्मानाबाद आणि पिंपरी-चिंचवड येथेही फूड बॅंकेचे कार्य सुरू होणार आहे, असे तमशेट्टी यांनी सांगितले.

जयहिंद फूड बॅंकेशी विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य, पोलिस विभागातील विविध खात्यांचे अधिकारी, नोकरदार, वकील, डॉक्‍टर, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, शेतकरी असे अनेक घटक जोडले आहेत. त्यांच्यामार्फत लग्न समारंभ, घरगुती कार्यक्रम, वाढदिवस इत्यादी कार्यक्रमांतील शिल्लक अन्न, नवरात्रोत्सव मंडळे, गणेश मंडळांचा महाप्रसाद आणि धान्य घेऊन गरजूंपर्यंत पोचवले जाते.

सर्व सदस्य हे जयहिंद फूड बॅंकेच्या व्हॉट्‌सऍप ग्रुपवर जोडले आहेत. एखाद्या कार्यक्रमात शिल्लक अन्नाबाबत ग्रुपमध्ये कळवले जाते. लगेच ग्रुपमधील स्वयंसेवकांमार्फत संबंधित ठिकाणचे खाण्यायोग्य शिल्लक अन्न घेण्यापासून ते वाटण्यापर्यंत कार्य केले जाते. जयहिंद फूड बॅंकेचे कार्य सोशल मीडियाच्या मदतीने लोकांपर्यंत पोचत आहे. 

इतर उपक्रम 
संस्थेतर्फे 15 ऑगस्ट 2017 रोजी भूकमुक्त भारत हा उपक्रम राबविण्यात आला. महापालिकेच्या अनेक शाळा, शासकीय रुग्णालयामधील रुग्णांना फळे, बिस्किटे आणि त्यांच्या नातेवाइकांना अन्नाची पाकिटे देण्यात आली. मंदिर, मशिद येथील मनोरुग्ण व गरजूंना जेवण दिले जाते. दिवाळीलाही गरीब वस्त्यांमध्ये भटकणाऱ्या कुटुंबांना, अनाथांना, शाळांमध्ये तसेच छोट्या गावांत जाऊन फराळाचे वाटप केले जाते. 

भूकबळीच्या विरोधातील सूर्यतारा महिला विकास व सामाजिक संस्था संचलित जयहिंद फूड बॅंकेची सुरवात 15 ऑगस्ट 2013 रोजी झाली. बॅंकेचे कार्य अखंडपणे सुरू आहे. अनेकांकडून त्यासाठी सहकार्य केले जाते. 
- सतीश तमशेट्टी, अध्यक्ष, जयहिंद फूड बॅंक, सोलापूर

काही सुखद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com