तरुणांनी बुजविले महामार्गावरील खड्डे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

नळदुर्ग - शहरातील रोकड्या हनुमान मित्रमंडळ व ख्वाजा गरीब नवाज ग्रुपच्या तरुणांनी शनिवारी (ता.२१) पुणे- हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवून गांधीगिरी  केली.

नळदुर्ग - शहरातील रोकड्या हनुमान मित्रमंडळ व ख्वाजा गरीब नवाज ग्रुपच्या तरुणांनी शनिवारी (ता.२१) पुणे- हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवून गांधीगिरी  केली.

महामार्गाची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. संबंधित विभागाकडून अनेकवेळा खड्डे बुजविण्यात आले; मात्र काही दिवसांनी स्थिती जैसे थे होत होती. महामार्गावरून दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते. संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे हा रस्ता अतिशय धोकादायक बनला आहे. खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात अनेकवेळा अपघात घडले आहेत. त्यामुळे तरुणांनी पुढाकार घेतला व अनेक खड्डे बुजवले. त्यासाठी त्यांनी ट्रॅक्‍टरमधून मुरूम आणून टाकला, श्रमदान केले. विशाल पिस्के, सागर मुळे, गणेश पिस्के, मौला शेख, शहेबाज शेख, सूरज मुळे, रवी पिस्के, सोनू मुळे, बबन पिस्के,  युनूस शेख, नविद शेख, रवी गायकवाड, विशाल कनकधर,  बंडू कनकधर, यांच्यासह रोकड्या हनुमान मित्रमंडळ व केजीएन ग्रुपच्या सदस्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.