ग्रामस्वच्छतेने सुरू केले वैवाहिक जीवन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

येळगावच्या योगेश व विजया वीर यांचे कौतुक; विद्यार्थ्यांच्या मोहिमेला प्रतिसाद

उंडाळे - नवदांपत्य म्हटलं, की साऱ्यांचेच लक्ष असते. नवीन आयुष्याची सुरवात ते कसे करतात, याकडेही अनेकांचे लक्ष असते. येळगावच्या नवदांपत्याने त्यांच्या नव्या जीवनाची सुरवातच ग्रामस्वच्छतेने केली. या आदर्शवत वाटचालीने वैवाहिक जीवनाची सुरवात करणाऱ्या येळगाव येथील योगेश व सौ. विजया वीर यांचे कौतुक होत आहे. 

घोगाव (ता. कऱ्हाड) येथील श्री संतकृपा औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र डोईजड यांच्या मार्गदर्शनाखाली येळगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर सुरू आहे. त्या दरम्यान सहभागी विद्यार्थ्यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांनी ग्रामस्वच्छता मोहीम हाती घेऊन संपूर्ण गाव स्वच्छ केला. या मोहिमेचा प्रारंभ ग्रामदैवत येळोबा देवाच्या मंदिरापासून करण्यात आला. याच वेळी नुकताच विवाह विधी आटोपून ग्रामदैवतांचे दर्शन घेण्यासाठी योगेश व सौ. विजया हे मंदिरात आले होते. त्या वेळी दर्शन घेऊन परतताना मंदिरासमोरच विद्यार्थी स्वच्छता मोहीम राबविण्याची तयारीत होते.

विद्यार्थ्यांची स्वच्छतेविषयी तळमळ पाहून व्यवसायाने डॉक्‍टर असलेल्या विजया हिने अभियंता असलेल्या पतीजवळ स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. सर्वांनीच त्याला होकार दिला. त्यानंतर नवदांपत्याने हातात झाडू घेतला आणि मंदिराचा संपूर्ण परिसर स्वच्छ केला. वैवाहिक जीवनाचा प्रारंभ ग्रामस्वच्छतेने केला.

Web Title: marriage life start to rural cleaning