‘काय बनायचे ते लिहून ठेवा’

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जुलै 2017

शेषनगर (ता. हिंगणा) - ‘‘तुम्हाला आयुष्यात जे बनायचे आहे, ते आज तुम्हाला मिळत असलेल्या नोटबुकाच्या पहिल्या पानावर लिहून ठेवा आणि त्यासाठी संघर्ष करा.’’ स्वप्नील खाडे या तरुणाचे प्रेरणादायी भाषण संपताच शेषनगर येथील विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

उच्चशिक्षित तरुणाई मार्गदर्शकाच्या भूमिकेत आणि छोट्या गावातील विद्यार्थी श्रोत्यांच्या भूमिकेत, असे आगळेवगळे दृश्‍य येथे आज पाहायला मिळाले. निवृत्त कार्यकारी अभियंता शुद्धोधन बडवने यांच्या पुढाकारातून शेषनगर येथे शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम मागील सहा वर्षांपासून राबविला जातो. नागपूर येथील लोखंडे नगर येथील सुदत्त बुद्धविहारातील अभ्यासिकेतील युवक-युवती या उपक्रमाशी जुळले. त्यांनी ‘एक वही एक पेन’ हे अभियान राबवीत नोटबुक आणि पेन गोळा केले. ‘पे बॅक टू सोसायटी’ या भावनेतून त्याचे वितरण आज येथे करण्यात आले. सुमित मेश्राम, हर्षल धनविजय, सौरभ जामगाडे, हिमांशू खनखने, महेश कांबळे, नीरज पाटील, पराग गवळी, प्रिया चव्हाण, अनुराग लोहवे, भाग्यश्री पोहले, अभिषेक भगत, रितीक पळसपगार, अक्षय इंगळे, आम्रपाली आडके, यश मदनकर हे युवा या कार्यक्रमात सहभागी झाले. जयदेव खोंडे, जितेंद्र म्हैसकर, प्रमोद काळबांडे, बबनराव गोरामन, सुरेश मानवटकर आदी प्रमुख पाहुण्यांची भाषणे झाली. येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना रेवतकर आणि शिक्षिका मीनाक्षी निर्वाण यांनी आयोजनासाठी सहकार्य केले.