‘अर्जुन’ची सातासमुद्रापार भरारी

‘अर्जुन’ची सातासमुद्रापार भरारी

‘पाइप नेटवर्क ॲनालिसिस ॲन्ड ऑप्टिमायझेशन’च्या प्रशिक्षणासाठी परदेशवारी नित्याचीच

नाशिक - ‘कम वुइथ मी, टाइम टू लेट अवर ड्रीम्स प्लाय फ्री ॲन्ड इट कम सो इजिली दॅट इज अवर वे...’ प्रसिद्ध गायिका मेल्डिना कॅरोल यांच्या ‘वुई चेंज द वर्ल्ड’ (भाग-१) अल्बममधील या काही ओळी आपल्यावरील संकटे, समस्यांवर मात करत प्रत्येकाने कशा पद्धतीने पुढे वाटचाल केली पाहिजे, हे दर्शवतात. हुरूप वाढवून आपले स्वप्न साकार करण्याचे बळ देतात. उच्चविद्याविभूषित अर्जुन गुजर या सातासमुद्रापार भरारी घेणाऱ्या आणि आपले स्वप्न साकारण्यासाठी ध्येय निश्‍चित केलेल्या तरुणांच्या बाबतीत हेच म्हणता येईल.   

भारतात एकमेव ‘पाइप नेटवर्क ॲनालिसिस ॲन्ड ऑप्टिमायझेशन’ करणाऱ्या अर्जुन गुजर यांनी २०१३ मध्ये हायड्रोन इंजिनिअरिंग सोल्यूशन प्रा. लि. कंपनी सुरू केली. क. का. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयातून २००७ मध्ये केमिकल इंजिनिअरिंगची पदवी घेत टेक्‍सास गाठले. तिथे एम.एस. (केमिकल इंजिनिअरिंग सायन्स) केले. छोट्या छोट्या प्रसंगातून त्यांना बरेच काही शिकायला मिळाले. कॅल्क्‍युलेशन आणि डिझायनिंगच्या कामासाठी ऑइल ॲन्ड गॅस इंडस्ट्रीत सिमिलेशन सॉफ्टवेअर्स वापरली जातात. ३० वर्षांपूर्वी ही सॉफ्टवेअर तयार झाली, तेव्हा त्यांची मदत त्या लोकांना होत होती. आता संपूर्ण काम डिझायनिंग सॉफ्टवेअरमध्ये केले जाते. या अनुभवामुळे अर्जुन यांचे सॉफ्टवेअरचे ज्ञान अधिक वाढत गेले.

भागीदारीत कंपनीची मुहूर्तमेढ
एफकॉन इंटरनॅशनल कंपनीत ते कामाला लागले. तिथे ऑइल ॲन्ड गॅस इंडस्ट्रीला लागणारे सॉफ्टवेअर तयार केली जात होती. अर्जुन ज्या गोष्टीत पारंगत होते त्याच्याशी निगडित तिथे नवीन सॉफ्टवेअर तयार केली. त्यामुळे त्या नोकरीसाठी ते ‘परफेक्‍ट’ होते, तसेच कंपनीचा दुसरा प्रकल्प हा ‘पाइप नेटवर्क ॲनालिसिस ॲन्ड ऑप्टिमायझेशन’चा होता. या प्रकल्पावर काम करणाऱ्या व्यक्तींना पार्टनरशिपची ऑफर देऊन कंपनी सुरू केली.
अमेरिकेत रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्लॅंट असतात. तिथे पाइप नेटवर्क ॲनालिसिसची कामे करावी लागतात. ती फारशी कोणी करत नाही. रिफायनरीच्या कामांचा कोणी अभ्यास करत नाही. अर्जुन यांच्याकडे सॉफ्टवेअर बनवायचे ज्ञान होते. या कामात ते यशस्वी होत गेले. पाच वर्षे अनुभव घेतल्यानंतर काम करायला सुरवात केली.

छोट्या छोट्या उपकरणांसाठी सॉफ्टवेअरची मागणी
शंभर एकरची कूलर वॉटर सिस्टिम असते. तिच्यात काही भागात कूलिंग मिळत नसले तरी उत्पादन कमी होते. ही समस्या अवघड असते. ती शोधण्यासाठी पाइप साइज कमी करणे, पाइप नेटवर्कचा अभ्यास करून पाइप नेटवर्क ॲनालिसिस ॲन्ड ऑप्टिमायझेशन करून ती समस्या सोडविली जाऊ शकते. अमेरिकेत हे काम चालू केले तेव्हा त्यांच्याकडून सॉफ्टवेअरची मागणी केली आणि ते काम सुरू झाले. अर्जुन यांना कामासाठी परदेशातून बोलावले जाते. ही नवीन संकल्पना असल्यामुळे लोकांना माहीत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com