प्रदीपकुमारच्या जिद्दीला नाशिककरांचा सलाम

प्रदीपकुमारच्या जिद्दीला नाशिककरांचा सलाम

नाशिक - इंदूरहून बाराशे किलोमीटर अंतर सायकलवरून पार करत प्रदीपकुमार सेन शहरात दाखल झाला. रेल्वे अपघातात एक पाय गमावल्यानंतर त्याने स्वच्छ भारत, अपंग कल्याण, पर्यावरण संतुलन या विषयांवर जनजागृतीसाठी भारतभ्रमण करण्याचा निर्णय घेतला. कृत्रिम पायाच्या सहाय्याने सायकल चालविण्याच्या त्याच्या जिद्दीला नाशिककरांनी सलाम केलाय.

अपंगत्व म्हणजे शिक्षा नव्हे, तर परिस्थितीने जीवनाचा संघर्ष करण्यासाठी दिलेले लक्षण आहे, याचा प्रत्यय प्रदीपकुमार याच्या कर्तृत्वातून दिसून येतो. नाशिकमध्ये आगमन होताच राजस्थानमधील सेन समाजातर्फे त्याचा फेटा बांधून स्वागत करण्यात आले. महाराष्ट्र राज्य राजस्थान सेन ट्रस्ट मंडळाचे नाशिकचे अध्यक्ष राजेंद्र टोकशिया, उपाध्यक्ष सुरेश सिसोदिया, प्रकाश बनभेरू, दीपक निर्वाण, माजी अध्यक्ष चंद्रकांत निर्वाण, प्रताप पवार, राजेंद्र साकला, युवक मंडलाध्यक्ष राजेंद्र तंवर, उपाध्यक्ष संतोष टाक, खजिनदार हर्षल टोकशिया, विनोद टाक, किशोरजी सिसोदिया, नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष प्रवीण खाबिया, योगेश्वर कोठावळे, सायकलपटू डॉ. मनीषा रौंदळ आदी उपस्थित होते.

आव्हानांचा सामना
मनी बाळगलेली जिद्द अनेकदा आव्हानांपुढे कमकुवत ठरते. मात्र, अपघातातील अपंगत्वावर मात करत प्रदीपकुमारने उद्दिष्टाला गवसणी घालण्याचा निश्‍चय केला आहे. त्याने स्वच्छ-सुंदर भारतच्या निर्मितीसाठी प्रवास सुरू केला आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपण ध्येयपूर्तीसाठी संघर्ष केला पाहिजे. यात जीवनाचा खरा आनंद आहे, असा सल्ला तो तरुण पिढीला देतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com