खडकाळ, माळरान टेकडीवर जंगल फुलवणारा अवलिया

खंडू मोरे
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

खामखेडा (नाशिक): कळवण तालुक्यातील अभोण्याच्या डोंगरावर पाच हजार झाडे सध्या टेकडी व पर्यावरणाची शोभा वाढवत आहेत. मात्र, हे सगळं शक्य झालंय एका अवलिया मुळे. गेली पंधरा वर्षे अव्याहतपणे झाडे लावून एकट्याने तब्बल सात एकर क्षेत्रावर पाच हजार झाड लावत ओसाड माळरानाच हिरव्यागार जंगलात रूपांतर सुरेश पवार या अवलियाने केलं आहे.

खामखेडा (नाशिक): कळवण तालुक्यातील अभोण्याच्या डोंगरावर पाच हजार झाडे सध्या टेकडी व पर्यावरणाची शोभा वाढवत आहेत. मात्र, हे सगळं शक्य झालंय एका अवलिया मुळे. गेली पंधरा वर्षे अव्याहतपणे झाडे लावून एकट्याने तब्बल सात एकर क्षेत्रावर पाच हजार झाड लावत ओसाड माळरानाच हिरव्यागार जंगलात रूपांतर सुरेश पवार या अवलियाने केलं आहे.

शासन स्तरावरून वृक्ष लागवड व संवर्धनासाठी अनेक उपक्रम राबवले जातात. वृक्ष संवर्धनाचा राष्ट्रीय उपक्रम शासनाला राबवावा लागतो. परंतु, तरीदेखील अमर्याद वृक्ष तोड सर्वत्र होतच असते. मात्र, वृक्ष संवर्धनाची जबाबदरी घ्यायला कुणीही समोर येत नसल्याने मोठा खर्च वाया जातो. मात्र, अभोणा येथील सुरेश पवार यांनी गिरनागौरव प्रतिष्ठानच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यात सामाजिक कार्य उभे केलं आहे. या कार्याबरोबरच आपल्या जन्मभुमी अभोणा येथील उजाड ठेकडीवर पाच हजार वृक्ष लागवड व संगोपन करत हा परिसर हिरवागार बनवत वृक्ष संवर्धनाचा आगळा वेगळा ठसा आदिवासी भागात उमटवला आहे.

झाडे लावण्याच्या कामाने झपाटून गेलेल्या पवार यांनी डोंगराचे रुपडेच पालटले आहे. त्यांनी अभोण्यातील या टेकडीवर साग, आवळा, चिंच, बांबू, कन्सार, पताडी, लिंब, शिवडी, सिसव आदि अनेक प्रकारचे सुमारे पाच हजार वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन व स्वरक्षणाची जबाबदारी स्वतावर घेतली आहे. वृक्षांची वाढ देखील या भागातील चांगल्या पावसामुळे उत्तम होऊ लागल्याने हा परिसर हिरवागार दिसू लागला आहे.

एक निश्‍चित ध्येय घेऊन ते प्रवासाला निघाले होते, त्यामुळे त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. गेली पंधरा वर्षे ते झाडे लावण्याचेच काम करीत आहेत. कळवण तालुका पावसाचा तालुका असल्याने लागवडी नंतर संगोपन चार पाच वर्षच केल्याने झाडांची चांगली वाढ होते. पवार यांनी लागवड केलेल्या झाडांची चांगली वाढ असून या ठेकडीवर त्यामुळे जंगलच झाले आहे. सध्या या हिरव्यागार टेकडीवरील जंगलात पक्षांचा किलबिलाट ऐकू येऊ लागला आहे.

एक माणूस जंगल उभारू शकतो, हे कोणालाही खरे वाटत नाही; पण ते काम सुरेश पवार यांनी केले आहे. त्यांनी झाडांच्या संवर्धनासाठी विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करत  ‘एक विद्यार्थी, दोन झाडे’ही संकल्पना अभोणा परिसरातील शाळा शाळात त्यांनी मांडली. विद्यार्थ्याने एक झाड लावायचे. त्याचे पालकत्व घ्यायचे. झाड जगविण्यासाठी त्याने लक्ष द्यायचे यासाठी देखील ते शाळा शाळात फिरत विध्यार्थ्यांमध्ये वृक्ष संवर्धनाचा संस्कार पेरत आहेत.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :