खैरे दांपत्याकडून शाळेला ५ गुंठे जमीन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

न्हावरे - शिरूर तालुक्‍यातील इनामगावनजीक नांद्रेमळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला कल्पना खैरे व सुधाकर खैरे या दांपत्यांनी पाच गुंठे जमीन विनामोबदाला बक्षीसपत्र करून दिली. त्यांचे परिसरात कौतुक होत आहे. 

नांद्रेमळा शाळेसाठी जिल्हा परिषदेची इमारत आहे; मात्र ती खैरे दांपत्याच्या जागेत होती. शाळेसाठी शासकीय किंवा इतर निधी मिळवण्यासाठी अडचणी येत होत्या. शाळेचा भौतिक विकास रखडला होता. जिल्हा परिषदेच्या नावावर जागा व्हावी, अशी मागणी होत होती. त्यासाठी पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र गदादे यांनी पुढाकार घेऊन खैरे दांपत्याला विनंती केली. खैरे दांपत्याने सध्याच्या जागेचा बाजारभावाचा विचार न करता उदात्त हेतूने विनामोबादला बक्षीसपत्र करून शाळेच्या मुख्याध्यापिका शीतल शेंडे, सहशिक्षिका सुरेखा निचीत यांच्याकडे दिले. या प्रसंगी पंचायत समिती सदस्य राजेंद्र गदादे, माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रेय नांद्रे आदी उपस्थित होते.