दहीहंडीवरील खर्च वाचवून शेतकऱ्यांना खतांचे वाटप

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

कात्रज - दहीहंडीसाठी होणारा खर्च विधायक कार्याकडे वळविण्याच्या हेतूने कात्रज येथील शिवशंभू प्रतिष्ठानने वेल्हा तालुक्‍यातील विहीर या गावातील गरजू शेतकऱ्यांना एक टन खतांचे वाटप केले.

कात्रज - दहीहंडीसाठी होणारा खर्च विधायक कार्याकडे वळविण्याच्या हेतूने कात्रज येथील शिवशंभू प्रतिष्ठानने वेल्हा तालुक्‍यातील विहीर या गावातील गरजू शेतकऱ्यांना एक टन खतांचे वाटप केले.

 स्वातंत्र्य दिन आणि दहीहंडी उत्सवाचे औचित्य साधून युवराज पोकळे यांच्या स्मरणार्थ विहीर गावातील गरजू शेतकऱ्यांना तब्बल एक टन खतांचे वाटप करण्यात आले. उपसरपंच नवनाथ शिळीमकर आणि ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत केले. शिवशंभू प्रतिष्ठानचे महेश कदम म्हणाले, ‘‘वॉटर कप स्पर्धेत सहभागी एका गावात जाऊन प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी श्रमदान केले होते. तेव्हा शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. बळिराजाला मानसिक आधाराची गरज आहे हे स्पष्ट झाले होते. त्यांना योग्यवेळी सहकार्य केले पाहिजे, या उद्देशाने दहीहंडी रद्द केली आणि खतांचे वाटप केले.’’ या वेळी नथू शिळीमकर, गेनू राऊत, कोंडिबा भिकुले, बाळू जोरकर, अक्षय दीक्षित आणि प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.