मोफत शिक्षण देणारी ‘ज्ञानदायिनी’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

वस्तीतील मुलांचे दहावीच्या परीक्षेत यश; सरवदे दाम्पत्याचा उपक्रम

पुणे - परिस्थितीशी झगडत शिक्षण घेतलेल्या सरवदे दाम्पत्याने नोकरीसाठी पुणे गाठले अन्‌ चांगल्या पगाराची नोकरी मिळवली; पण समाजासाठी काहीतरी करण्याच्याऊर्मीने सरवदे दाम्पत्याने प्राध्यापकाची नोकरी सोडली अन्‌ पुण्यातील वस्त्यांमधील मुलांसाठी १५ वर्षांपूर्वी मोफत अभ्यास वर्ग सुरू केले. त्यांच्या प्रयत्नाने आज वस्तीतील मुलांनी दहावीत चांगले यश मिळविले आहे. ते दाम्पत्य म्हणजे प्रा. मधुकर आणि वंदना सरवदे.

धुणीभांडी आणि मोलमजुरी करणाऱ्या आई-वडिलांच्या मुलांना या दाम्पत्याने शिक्षण देऊन प्रगतीचे पंख दिले आहेत. त्यांच्या प्रयत्नामुळे आज अभ्यास वर्गातील मुलांनी दहावीत घवघवीत यश मिळवले आहे. 

ज्ञानदायिनी संस्थेच्या माध्यमातून गेल्या १५ वर्षांपासून सरवदे दाम्पत्य अपर इंदिरानगर डेपो आणि रामनगर (वारजे-माळवाडी) येथील वस्तीमधील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यास वर्ग घेत आहेत. कष्टकऱ्यांच्या मुलांना शिकवून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी हे दाम्पत्य झटत आहे. मुलांना अभ्यासक्रमातील सर्व विषय कोणतेही शुल्क न आकारता ते शिकवतात.  

याबाबत प्रा. मधुकर सरवदे म्हणाले,‘‘मी उस्मानाबाद जिल्ह्यातील चिलवडी या गावचा आहे. मी परिस्थितीशी झगडून शिक्षण घेतले आणि नोकरीसाठी पुणे गाठले. आम्हा दोघांना सामाजिक कार्याची आवड असल्याने नोकरी सोडून वस्तीत अभ्यास वर्ग सुरू केले आणि मुलांना शिकवू लागलो. यंदा दहावीत मुलांनी मिळवलेल्या यशामुळे आम्हाला आनंद होत आहे. ’’