तुषार निकम होणार लेफ्टनंट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

पुणे - स्वप्नपूर्तीचा ध्यास, प्रबळ इच्छाशक्ती, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर तुषार निकम या तरुणाने चिंचोशीसारखे छोटेसे गाव ते चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (ओटीए) हा प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. चेन्नई येथे ४९ आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तो सैन्य दलात ‘लेफ्टनंट’ या पदावर रूजू होईल. 

पुण्यापासून सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर चाकण-शिक्रापूर महामार्गालगत असलेल्या चिंचोशी या गावात तुषारने आपले दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. तुषारचे वडील माध्यमिक शाळेत शिक्षक आहेत, तर आई गृहिणी आहे. लहानपणापासूनच सैन्यदलाची आवड असणारा तुषारने अकरावी व बारावीचे शिक्षण औरंगाबाद येथील डिफेन्स करिअर ॲकॅडमीमधून पूर्ण केले. त्यानंतर त्याने पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय येथून बी. एससी पदवी संपादन केली.

२०१६ मध्ये दिलेल्या सीडीएस परीक्षेत तो पात्र ठरला आणि मुलाखतीसाठी त्याची निवड झाली. जून २०१७ मध्ये भोपाळ येथे झालेल्या एसएसबी मुलाखतीत १०२ उमेदवारांपैकी केवळ तुषारचीच निवड झाली.

लहानपणापासून जे स्वप्न मी पाहत आलो आहे, ते आता पूर्ण होणार याचा मनापासून आनंद होत आहे. सोबतच या प्रशिक्षणाबाबत उत्सुकताही आहे. आतापर्यंत ज्या जिद्दीने हा प्रवास पूर्ण केला आहे. त्याच जिद्दीने पुढील प्रवास करणार आहे. 
- तुषार निकम