कर्वेनगरच्या युवकांकडून विहिरीचे पुनरुज्जीवन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

पौडरस्ता - कर्वेनगर येथील ‘स्वराज्याचे शिलेदार’ या गटाने श्रमदानातून शिवकालीन विहीर पुनर्जिवित केली आहे. पुणे-पाबे रस्त्यावर खामगाव व कोंडगाव या दोन्ही गावांना जोडणाऱ्या रस्त्याच्या कडेला ही विहीर आहे. संपूर्ण दगडी बांधकाम असलेली विहीर चुन्याचा वापर करून बनविण्यात आली आहे. विहीर गोलाकार असून, त्यात उतरण्यासाठी तीन टप्प्यांत पायऱ्या केल्या आहेत. उतरताना दोन्ही बाजूला खिडकीसारखी रचना आहे. या विहिरीत मोठ्या प्रमाणावर ५ ते१० फूट गाळ, पालापाचोळा न विहिरीच्या ढासळलेल्या दगडी होत्या. त्यावर मोठ्या प्रमाणावर गवत वाढले होते. इतिहासाची साक्ष देणारी शिवकालीन विहीर पूर्णपणे गाडली गेली होती.

पौडरस्ता - कर्वेनगर येथील ‘स्वराज्याचे शिलेदार’ या गटाने श्रमदानातून शिवकालीन विहीर पुनर्जिवित केली आहे. पुणे-पाबे रस्त्यावर खामगाव व कोंडगाव या दोन्ही गावांना जोडणाऱ्या रस्त्याच्या कडेला ही विहीर आहे. संपूर्ण दगडी बांधकाम असलेली विहीर चुन्याचा वापर करून बनविण्यात आली आहे. विहीर गोलाकार असून, त्यात उतरण्यासाठी तीन टप्प्यांत पायऱ्या केल्या आहेत. उतरताना दोन्ही बाजूला खिडकीसारखी रचना आहे. या विहिरीत मोठ्या प्रमाणावर ५ ते१० फूट गाळ, पालापाचोळा न विहिरीच्या ढासळलेल्या दगडी होत्या. त्यावर मोठ्या प्रमाणावर गवत वाढले होते. इतिहासाची साक्ष देणारी शिवकालीन विहीर पूर्णपणे गाडली गेली होती. रस्त्याच्या कडेला असून ती दिसत नव्हती. कित्येक वर्षेनतंर पहिल्यांदाच इतका गाळ काढण्यात आला. गावकरी तसेच या मार्गाचा वापर करण्याऱ्या लोकांसाठी यामुळे पुन्हा पाणी उपलब्ध होणार आहे.

प्रतिष्ठानचे प्रमुख मंगेश नवघणे यांनी सांगितले की, ही शिवकालीन विहीर, ३० फूट लांब आणि २० फूट खोल आहे. विहिरीच्या बांधकामावर मोठी झाडे आल्याने दगडी बांधकाम ढासळत आहे. तरीही ही विहीर आवर्जून पाहण्यासारखी आहे.’’

या मोहिमेत सुनील गोरे, सूरज सकपाळ, अविनाश चोरघे, स्वप्नील कळबंटे, चैतन्य जाधव, अनिकेत शिर्के सहभागी झाले होते. मोहिमेचे संयोजन प्रतिष्ठानचे प्रमुख मंगेश नवघणे यांनी केले.

टॅग्स