प्रशिक्षणातून महिलांना मिळतोय रोजगार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

दुधोंडी, जि. सांगली  - ग्रामीण भागातील महिलांना गावातच रोजगार उपलब्ध होण्यासाठी अाणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, यासाठी शासनाच्या वतीने गावोगावी विशेष उपक्रम राबविले जात आहेत. गावच्या विकासात महिलांचे मोलाचे योगदान लाभावे, यासाठी शासनाने १४ व्या वित्त आयोगांतर्गत महिलांना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यामुळे महिलांना प्रशिक्षणासह स्वयंरोजगार उपलब्ध होणार आहे, असे मत सरपंच विजय आरबुने यांनी व्यक्‍त केले. दुधोंडी गावातील सुमारे २०० ते २५० महिलांना १४ व्या वित्त आयोगाद्वारे प्रशिक्षण देण्यात अाले आहे.

दुधोंडी, जि. सांगली  - ग्रामीण भागातील महिलांना गावातच रोजगार उपलब्ध होण्यासाठी अाणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, यासाठी शासनाच्या वतीने गावोगावी विशेष उपक्रम राबविले जात आहेत. गावच्या विकासात महिलांचे मोलाचे योगदान लाभावे, यासाठी शासनाने १४ व्या वित्त आयोगांतर्गत महिलांना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यामुळे महिलांना प्रशिक्षणासह स्वयंरोजगार उपलब्ध होणार आहे, असे मत सरपंच विजय आरबुने यांनी व्यक्‍त केले. दुधोंडी गावातील सुमारे २०० ते २५० महिलांना १४ व्या वित्त आयोगाद्वारे प्रशिक्षण देण्यात अाले आहे. आरबुने म्हणाले, की येत्या काळात  शंभर महिलांना स्वयंरोजगारासाठी शिलाई मशिनसह अन्य साहित्य देण्याचा प्रयत्न  आहे. 

गावातील महिलांसाठी सुमारे एक महिना विविध उद्योगांच्या प्रशिक्षणाचे अायोजन करण्यात अाले होते. यापैकी २०० ते २५० महिलांनी शिवणकाम आणि ब्यूटी पार्लर प्रशिक्षणाचा लाभ घेतला. या शिक्षणाचा वापर करून महिला नवीन उद्योग सुरू करून आपली आर्थिक प्रगती साधण्याचा प्रयत्न करत अाहेत. 

प्रशिक्षण झाल्यानंतर प्रत्येक महिलांना प्रमाणपत्र व माहिती पुस्तिकांचे वाटप करण्यात अाले. दरम्यान, उद्योग सुरू करण्यासाठी कमी दरात कर्जही उपलब्ध होणार असल्याची माहिती पृथ्वी संग्राम ग्रामविकासचे अध्यक्ष दादासाहेब यादव यांनी दिली.

या वेळी उपसरपंच रवींद्र नलवडे, सुनील नलवडे, माजी सरपंच डॉ. नागराज रानमाळे, अशोक भोसले, अभियंता मिलिंद जाधव, विवेक आरबुने, प्रताप जाधव, प्रल्हाद सावंत, पृथ्वी संग्राम ग्रामविकास संस्थेचे दादासाहेब यादव, प्रकल्प सहायक सिद्धार्थ रणदिवे, महिला सहायिका विमल यादव, नितीन मुळीक, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. जगदीश तिरमारे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. राधिका आरबुने यांनी आभार मानले.

Web Title: sangli news Employment opportunities available to women