‘गुलमोहर’मध्ये श्रमदानातून फुलवली बाग 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 सप्टेंबर 2017

ही आहे टीम...
आदित्य माने, अक्षता पाटील, पवन जांगिड, शोनक  पवार, निनाद परमणे, प्रज्ञा मगदूम, श्रद्धा आठवले, ऋतिका कुलकर्णी, सिद्धीशा गोखले, ऋतुजा चौगुले, सायली हेरेकर, वैदेही भागवत, गजानन सावंत, नितीराज पाटील, सौरभ सुतार, यश छाजेड, तेजस शेंदुरे, सानिका हिप्परकर, जनगन्नाथ पुरोहित, राधिका धुत, हृषीकेश चौगुले, विक्रांत कुलकर्णी, प्रचीती सौदागर.

सांगली - शहरात महावीर उद्यान, आमराई, प्रतापसिंह उद्यान... वगळता प्रशस्त बागाच उपलब्ध नाहीत. पालिकेच्या विकास आराखड्यातील आरक्षित बागांच्या जागा आज अस्वच्छतेच्या विळख्यात  अडकल्या आहेत. त्यांचा विकास करण्यासाठी पालिकेची यंत्रणाही अपुरी आहे. म्हणूनच बिरनाळे आर्किटेक्‍टच्या  विद्यार्थ्यांनी गुलमोहर कॉलनीतील आरक्षित जागेवर श्रमदानातून बाग फुलवली आहे. अगदी कमी खर्चात आणि प्रसन्न करणारी ही बाग साऱ्यांना खुणावते आहे. या बागेचे नुकताच लोकार्पण सोहळा झाला.  

शहर अनेक ठिकणी खुले भूखंड अस्वच्छतेच्या फेऱ्यात आहेत. मात्र आरक्षित बगांचा जागाही शोधण्याची वेळ पालिकेवर आली आहे. त्यामुळे भागातील नागरिकांनी फिरण्यासाठी अपवाद वगळता बागाच नाहीत. आपल्या महाविद्यालयाच्या परिसरात एक छान बाग असावी आणि ती आपण तयारी केलेली असावी, या उद्देशाने बिरनाळे आर्किटेक्‍टच्या विद्यार्थ्यांनी जागा शोधण्यास सुरवात केली. प्रत्यक्ष कामाला सुरवात करण्यासाठी निमित्त ठरले नॅशनल असोसिएशन ऑफ स्टुडंटस्‌ ऑफ आर्किटेक्‍चर (नासा) तर्फे आयोजित डिझाईन स्पर्धा व महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे. प्रथम आणि द्वितीय वर्षातील ४५ विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन प्रकल्प तयार केला. महापालिकेच्या सहकार्यातून गुलमोहर कॉलनीतील आरक्षित बगिचाची जागाही मिळाली. प्रत्यक्ष कामालाही सुरवात केली. पहिल्या टप्प्यात जागेची स्वच्छता केली. त्यानंतर आखणी करून बसण्याची व्यवस्था झाली. बांबूच्या सहाय्याने उभारलेली ही  ठिकाणी आज लक्षवेधी ठरताहेत. त्यानंतर परिसरातील भिंतींवर चित्र रेखाटून त्याही बोलक्‍या केल्या. हे सारे  काम अगदी वीस दिवसांत पूर्ण झाले. कॉलेजच्या वेळ वगळता दिवसरात्र या विद्यार्थ्यांनी ही बाग फुलवली आहे. यासाठी सुमारे पाच लाखांचा खर्च आला आहे. मात्र विद्यार्थ्यांचा पुढाकार पाहून अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. बागेचा लोकापर्ण सोहळात नुकताच झाला. त्यासाठी महापालिकेचे उपायुक्त सुनील पवार, वसंतराव बंडुजी पाटील ट्रस्टचे अध्यक्ष बबनराव बिरनाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नगरसेवक दिग्विजय सूर्यवंशी, रोहिणी पाटील, महेंद्र सावंत, स्नेहा सावंत, धनंजय कुंडले, सागर बिरनाळे उपस्थित होते. प्राचार्य विजय सांबरेकर, शंतनु जगताप शिक्षकांनी मार्गदर्शन केले.