आजोबा-आजींना ‘एलइडी दिव्यांची’श्रद्धांजली!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

कडेगाव - कडेगाव स्मार्ट सिटी’ या सोशल मीिडया ग्रुपच्या प्रबोधनातून शहरात लोकसहभागातून विकासकामे होत आहेत. त्यातून प्रेरणा घेऊन स्वप्नील धर्मे व प्रसाद धर्मे यांनी स्वखर्चाने दत्तनगर चौक व श्रीराम चौक येथे वीस हजार रुपये किमतीचे शंभर वॅटचे चार एलईडी दिवे बसवून आजी व आजोबांना अनोखी श्रद्धांजली वाहिली.

कडेगाव - कडेगाव स्मार्ट सिटी’ या सोशल मीिडया ग्रुपच्या प्रबोधनातून शहरात लोकसहभागातून विकासकामे होत आहेत. त्यातून प्रेरणा घेऊन स्वप्नील धर्मे व प्रसाद धर्मे यांनी स्वखर्चाने दत्तनगर चौक व श्रीराम चौक येथे वीस हजार रुपये किमतीचे शंभर वॅटचे चार एलईडी दिवे बसवून आजी व आजोबांना अनोखी श्रद्धांजली वाहिली. एलईडी दिव्यांचे लोकार्पण नागरिकांच्या हस्ते झाले. हे दोन्ही चौक एलईडीच्या दिव्यांनी ‘लख्ख’ उजळले आहेत.

शहराच्या विकासाला चालना मिळावी, पायाभूत सुविधा निर्माण होवून लोकांना लाभ व्हावा, या हेतूने काही नागरिकांनी ‘कडेगाव स्मार्ट सिटी’ ग्रुप सुरु केला. ग्रुपमध्ये जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील, सांगलीचे उपायुक्त सुनील पवार, पनवेल महापालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर, प्रांताधिकारी, तहसिलदार, येथील नगरसेवक, मुख्याधिकारी, अभियंते, डॉक्‍टर, वकील, शिक्षक, पत्रकार, नेत्यांसह सामान्य नागरिक आहेत.

ग्रुपने केलेल्या प्रबोधनातून लोकसहभागातून कामे सुरू आहेत. विधायक दृिष्टकोनातून येथील स्वप्नील व प्रसाद धर्मे यांनी प्रेरणा घेतली. आपले आजोबा गोविंदराव धर्मे व आजी गंगुबाई धर्मे यांच्या स्मरणार्थ धर्मे गल्ली, श्रीराम चौक व दत्तनगर चौकात स्वखर्चाने शंभर वॅटचे चार एलईडी दिवे बसवले. आजी-आजोबांना अनोखी प्रकाशमय श्रध्दांजली वाहिली. एलईडी दिव्यांचे लोकार्पण नुकतेच झाले. अंधारवाटा दूर दोन्ही चौक ‘लख्खं’ प्रकाशात उजळले आहेत. स्वप्नील, प्रसाद धर्मे यांच्यासह धर्मे कुटूंबियांचे नागरिकांतून कौतुक होत आहे.

दिवे लोकार्पणावेळी ज्येष्ठ नेते चंद्रसेन देशमुख, के. डी. धर्मे, माजी सरपंच विजय शिंदे, धनंजय देशमुख, डॉ.सुरेश पाटील, नगरपंचायतीचे गटनेते उदयकुमार देशमुख, ज्ञानेश्‍वर शिंदे, स्वप्नील धर्मे, प्रसाद धर्मे, विलास धर्मे, तानाजी भोसले, विनोद गोरे, तानाजी रास्कर, सुनील धर्मे, सतिश धर्मे, चंद्रकांत देसाई, बापूसाहेब देशमुख, राजेंद्र शिंदे, मुकुंद कुलकर्णी, शेखर पवार आदी, स्मार्ट सिटी ग्रुपचे सदस्य व नागरिक उपस्थित होते.