आध्यात्मिक शिक्षकाची विज्ञानवादी साधना

Spiritual teacher
Spiritual teacher

येवला -  अध्यात्म आणि विज्ञान या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याची प्रचीती दिली आहे, येथील भागवताचार्य व अध्यात्माचा अभ्यास असलेल्या संस्कृत शिक्षकाने. येथील स्वामी मुक्तानंद विद्यालयातील संस्कृत शिक्षक प्रसादशास्त्री कुळकर्णी अठरा वर्षांपासून म्हणजे १९९८ पासून विज्ञान प्रदर्शनातून ज्ञानभाषेचा प्रचार आणि प्रसार करून विज्ञान, अध्यात्म आणि संस्कृत यांचा संबंध स्पष्ट करीत आहेत. विज्ञान मेळाव्यातही विज्ञान नाटिका बसवून अंधश्रद्धा उच्चाटनाचा त्यांचा हा प्रयत्न स्तुत्य म्हणावा लागेल.

न्याय, योग, सांख्य, वैशिक, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा अशी सहा शास्त्रे असून, त्यांचीच उपषास्त्रे भौतिक, रसायन, जीवशास्त्र आहेत. ही सर्व शास्त्रे मूळ संस्कृतमधून आली असल्याचे ते सिद्ध करतात. कोटमगाव येथे विज्ञान नाट्य, पुरणगाव येथे मंगळयानावरील नाटिका तसेच एन्झोकेम विद्यालयात झालेल्या विज्ञान नाट्यस्पर्धेत दोन वेळा त्यांनी ‘पर्यावरण जपूया आणि स्वच्छता करूया’ नाटिका सादर केली आणि बक्षिसे मिळविली. विज्ञान वक्तृत्व स्पर्धेसाठीही विद्यार्थ्यांची तयारी करून घेत हा संस्कृत शिक्षक विज्ञानाच्या विचारवंतांचे विचार विद्यार्थ्यांकडून मुखोद्‌गत करवून घेत विद्यार्थ्यांना पारितोषिके प्राप्त करण्याची संधी देत आहे. त्यांनी विज्ञान वक्तृत्व स्पर्धेसाठी तीन, तर विज्ञान नाट्यासाठी पाच वेळा विद्यालयास करंडक मिळवून दिला आहे.

दोडी बुद्रुक, सातपूर येथील जनता विद्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात, तसेच संदीप फाउंडेशनमध्येही त्यांनी उत्तम सादरीकरण करीत पारितोषिके पटकावली. तालुका आणि जिल्हा पातळीवर लोकसंख्या शिक्षण गटात स्त्रीभ्रूण्‌हत्या या विषयावर प्रथम क्रमांक, तर एरंडगाव, पुरणगाव, पाटोदा, नगरसूल, मुखेड, धानोरे आदी ठिकाणच्या विज्ञान प्रदर्शनात त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत पारितोषिके मिळवून दिली. हस्तलिखित गटातून प्रथम क्रमांकाची परंपरा त्यांनी यापूर्वी कायम राखली. लोकसंख्या शिक्षण गटात ते स्त्रीभ्रूणहत्या, एड्‌स, इबोला, स्वाइन फ्लू, चिकणगुण्या या विषषावर कारणे- परिणाम- उपचार असे प्रबोधन करतात. याचमुळे त्यांना दरवर्षी प्रथम क्रमांक प्राप्त होतो. तक्ते, प्रबोधन तथा माहितीपट, विज्ञान प्रदर्शनातून संस्कृत आणि विज्ञान यावर काही तक्ते व स्लाइड शो असा उपयोग करून घेत विद्यार्थ्यांचे ते प्रबोधन करीत आहेत. यंदाच्या विज्ञान प्रदर्शनात ऋषीकेश कायस्थ, ओम शितोळे, जयेश मांडवडे, रोहित जगताप, विशाल वाघ, ओम कायस्थ, तन्मय कापरे, प्रेम मांडवडे, नागराज खेरूड यांनी या उपक्रमात सहभाग घेऊन प्रथम क्रमांक मिळविला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com