विद्यार्थी संशोधनात रमतात ही आनंदाची बाब 

विद्यार्थी संशोधनात रमतात ही आनंदाची बाब 

रत्नागिरी - संशोधनवृत्ती अंगी बाळगून नवे शोध लावण्यासाठी चिकाटीने काम करण्याची तयारी रत्नागिरीतील विद्यार्थ्यांनी दाखवली असून, यामुळेच बालवैज्ञानिक तयार होत आहेत. नियमित दैनंदिन जीवनशैलीला अनुसरणारे उपक्रम आणि उपकरणे यावर या मुलांचा भर दिसतो. कचऱ्याचा प्रश्‍न असो वा ऊर्जेचा अथवा व्यायामातून मिळणारे फायदे किंवा खारफुटी यांसारख्या वेगवेगळ्या क्षेत्रातील मुद्द्यांवर ही मुले काही नवीन धांडोळा घेऊ इच्छितात, हे चित्र सुखावणारे आहे. 

डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेतील यशस्वी बालवैज्ञानिकांचा सत्कार रत्नागिरी पालिका व रत्नागिरी विज्ञान केंद्रातर्फे करण्यात आला. त्यावेळी येथे रत्नागिरीतून बालवैज्ञानिक निर्माण होणे ही अतिशय आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे, असे मत आमदार उदय सामंत यांनी व्यक्त केले. सहावीमध्ये सुवर्णपदक विजेत्या मृदुला पाटकर (वाघ्रट हायस्कूल), सार्थक आठवले (फाटक हायस्कूल), कल्याणी केळकर (फाटक हायस्कूल), ऋग्वेद तारगावकर (जीजीपीएस) या रौप्यपदक विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. याच परीक्षेत नववीच्या गटातून रत्नागिरीतील विद्यार्थ्यांनी आपली चुणूक दाखवली आहे. यात मीरा सावंत-देसाई (पटवर्धन हायस्कूल) हिला सुवर्णपदक प्राप्त झाले. ऋग्वेद कुलकर्णी (पटवर्धन हायस्कूल) व आर्या सप्रे (फाटक हायस्कूल) यांना रौप्यपदके प्राप्त झाली आहेत. 

या सर्व विद्यार्थ्यांना डॉ. स्वप्नजा मोहिते यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांचे शिक्षक, पालक यांच्या मदतीने या महत्त्वपूर्ण परीक्षेत पदके मिळवू शकले. या वेळी नगराध्यक्ष राहुल पंडित, उपनगराध्यक्ष राजेश सावंत, बंड्या साळवी, शिल्पा सुर्वे व अभिजित गोडबोले आदी उपस्थित होते. 

मिहीर पानवलकरचा सत्कार 
मिहीर पानवलकर याने अमेरिकेत एअरक्राफ्ट कॅरियर या नव्या तंत्रज्ञानावर झालेल्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल सत्कार केला. या तंत्रज्ञानासाठी त्याला सुमारे साडेचार कोटी रुपयांचे पॅकेज देण्याची तयारी तेथील कंपनीने दाखवली होती; पण ती नाकारून हे तंत्रज्ञान भारतात विकसित करण्याचा त्याचा मानस आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com