मोतीबिंदूची शस्त्रक्रिया केली यशस्वी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

डोळे हा तसा नाजूक विषय असून, यासंदर्भात शस्त्रक्रिया करणेही तितकेच आव्हानात्मक आहे. 2001 पासून शस्त्रक्रिया करीत असल्याने अनुभव दांडगा होता. या दरम्यान जानेवारी 2007 मध्ये स्वत:च्या रुग्णालयात पहिल्या शस्त्रक्रियेच्या वेळी सावधगिरीच्या उपाययोजना करीत मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली. त्या शस्त्रक्रियेबाबत सांगताहेत, रामोळे आय हॉस्पिटलचे संचालक डॉ. अभिजित रामोळे...

जानेवारी 2007 मध्ये नाशिकमध्ये खासगी रुग्णालय सुरू केल्यानंतर साधारणत: 65 वय असलेले रुग्ण दाखल झाले होते. त्यांची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करायची होती. संबंधित रुग्णाच्या सर्व चाचण्या करून घेतल्या. डोळे हा संवेदनशील भाग असल्याने शस्त्रक्रियेविषयी काळजी घेणे आवश्‍यक असते. कारण सुरळीतरीत्या शस्त्रक्रिया पार पडली तर रुग्णाला पुढे त्रास उद्‌भवत नाही.

ऑपरेशन थिएटरमधील सर्व मशिन अद्ययावत होत्या व प्रथमच वापरात येणार होत्या. सर्वप्रथम ऑपरेशन थिएटरचे दोन वेळा निर्जंतुकीकरण करून घेतले. मायक्रोबायोलॉजीकल चाचणीसाठी नमुने घेण्यात आले. औषधांच्या आवश्‍यकतेबाबत औषध दुकानदारास पूर्वकल्पना दिलेली होती. जर शस्त्रक्रियेत गुंतागुंत निर्माण झाली तर ऐनवेळी काय करायचे, याचेही नियोजन होते. रुग्णालयातील पहिलीच शस्त्रक्रिया असल्याची कल्पना रुग्णाला दिलेली होती. त्यांच्या सहमतीनंतर व आरोग्य चाचणीच्या अहवालांचा अभ्यास केल्यानंतर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. अगदी सुरळीत पद्धतीने व रुग्णालयातील सर्व स्टाफच्या मदतीने आम्ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली.
(शब्दांकन - अरुण मलाणी)

टॅग्स

काही सुखद

संकटाच्या वादळातूनही ऑटोच्या मदतीने काढला मार्ग औरंगाबाद - संसाराचा गाडा हाकण्यासाठी पती आणि पत्नी ही दोन चाके फार महत्त्वाची...

सोमवार, 21 ऑगस्ट 2017

एखादी कला, अावड जर व्यवसायात बदलता अाली तर स्वतःसह इतरांसाठीही रोजगार निर्मिती करण्यास मदतगार ठरते, हे अकोला शहरातील नारायणी पवार...

रविवार, 20 ऑगस्ट 2017

कात्रज - दहीहंडीसाठी होणारा खर्च विधायक कार्याकडे वळविण्याच्या हेतूने कात्रज येथील शिवशंभू प्रतिष्ठानने वेल्हा तालुक्‍यातील...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017