उंडाळ्यात साकारतंय आठवणींचे स्मृतिवन

जगन्नाथ माळी
बुधवार, 5 जुलै 2017

‘नवयुवक’चा उपक्रम; रक्षा विसर्जनदिनी मृताच्या स्मरणार्थ वृक्षारोपण

उंडाळे - गावातील प्रत्येक व्यक्तीचे त्या गावांशी अतुट नाते असते. एखादी व्यक्ती मृत झाल्यावर गावातील आठवणी संपत नाहीत. मृत्यूनंतरही गावातील प्रत्येक व्यक्तीच्या आठवणी कायम राहाव्यात, यासाठी दिवंगताच्या रक्षा विसर्जनादिवशी त्याच्या नावाने एक झाड लावण्याचा अभिनव उपक्रम येथील नवयुवक गणेश मंडळाने हाती घेतला आहे. प्रत्येक मृत गावकऱ्याच्या नावाचे झाड लावून ‘स्मृतिवन’ साकारण्याचा या मंडळाचा प्रयत्न सुरू आहे. 

गेल्या अनेक वर्षांपासून गावातील व्यक्तीच्या मृत्यूनंतरही त्याला सेवा देऊन सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे कार्य हे मंडळ करत आहे. गावातील मृत व्यक्तीच्या अंत्यविधीला लागणारे सर्व साहित्य मंडळ पुरवते. प्रत्येक मृत व्यक्तीला श्रद्धांजली वाहणारा फलक तयार करून गावातील क्रांती चौकात ‘श्रद्धांजली कॉर्नर’वर लावला जातो. त्यामुळे गावातील लोकांना रक्षा विसर्जन व इतर विधीची माहिती मिळते. रक्षा विसर्जन पाण्यात केल्याने जलप्रदूषण होते. हे टाळण्यासाठी त्या रक्षेचा वापर करून त्यामध्ये मृत व्यक्तीच्या नावाने झाड लावले जाते. एवढे करून मंडळातील कार्यकर्ते थांबले नाहीत, तर मंडळाने दशक्रिया विधीकरिता शेड व चबुतराही बांधून दिला आहे. रक्षा विसर्जनादिवशी श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता ध्वनिक्षेपकाची सोय उपलब्ध करून दिली आहे.