‘कॅप्टन’मधून पुढे आली समलिंगीची कहाणी

‘कॅप्टन’मधून पुढे आली समलिंगीची कहाणी

जगण्याची उमेद सर्वांनाच असते. मग तो गे असो अथवा पुरुष. समलिंगी लग्न करतात. डॉ. सोमनाथ सोनवलकर यांनी गे या प्रकारावर कॅप्टन..कॅप्टन संहितेतून प्रकाश टाकला. मनोहर सुर्वे दिग्दर्शित बसणी पंचक्रोशी ग्रंथालय या संस्थेने राज्य नाट्य स्पर्धेत हा प्रयोग केला. उत्कृष्ट नेपथ्य, प्रकाशयोजना, पार्श्‍वसंगीत आणि अभिनयातून गे जीवन जगणाऱ्या समलिंगीची कहाणी हुबेहूब उतरविण्यास संस्था यशस्वी झाली. स्पर्धेत मनाचा ठाव घेणारी उत्तम कलाकृती रसिकांना पाहायला मिळाली.

काय आहे नाटक?
वादळाशी खेळणारा कॅप्टन जॉन व विक्रांत यांच्यातील समलिंगी प्रेमाच्या कथेचे ‘कॅप्टन...कॅप्टन’ हे नाटक. बालपणापासूनच ‘गे’ या प्रकारात वावरणारा विक्रांतच्या मनातून हा प्रकार लग्नानंतरच जाईल, असे आई-वडिलांना वाटते. त्यामुळे ते त्याचे लग्न करतात. नेव्हीमध्ये भरती झालेला असल्यामुळे तो लग्नानंतर लगेचच बोटीवर जातो. 

इकडे पत्नी सानिया जनसंवाद या इलेक्‍ट्रॉनिक मीडियात पत्रकार असते. विक्रांतवर नितांत प्रेम असते. विक्रांत कॅप्टन जॉनच्या प्रेमात पडतो. दोघे लग्न करून एखादं मुल ॲडॉप्ट करणार असतात. याच अवधीत विक्रांत पत्नी सानिया हिला सर्व सांगणार असतो. पण शक्‍य होत नाही. तो आई-वडिलांच्या दबावाखाली घाबरलेला असतो. तो तिला सांगत नाही. ज्या दिवशी घरी येतो, त्यावेळी सानियाचा मित्र आदित्यही तेथे असतो. त्याचवेळी बेडरूमध्ये विक्रांत-जॉनला एकत्र पाहते आणि हतबल होते. त्याच रात्री विक्रांत घरातून बोटीवर निघून जातो. समलिंगी प्रकाराच्या मुळापर्यंत जाण्याचा सानिया निर्धार करते. बोटीवर येते. त्यावेळी विक्रांत आपला जीवन प्रवास उलगडतो. कॅप्टन जॉन समुद्रात उडी टाकून आत्महत्येचा प्रयत्न करतो. अखेर त्याला विक्रांत वाचवतो...

पात्र परिचय
कॅप्टन जॉन - ओंकार पाटील, विक्रांत - निशांत जाधव, सानिया - मृणाली डांगे, काका - अजित पाटील, आदित्य - कौस्तुभ केळकर, ऑफिसर दुसरा - संतोष गार्डी, ऑफिसर तिसरा - अमोल जामसूदकर, व्हिलमन - गणेश शिरोडकर, खलाशी - जयेश शिवलकर, शुभम शिवलकर, सागर मायंगडे, मिथुन पवार, प्रवीण धुमक, सुदेश पाटील, मयूर केळकर.

सूत्रधार आणि सहाय्य
सहदिग्दर्शक - अजित पाटील, नेपथ्य - प्रवीण धुमक, प्रकाश योजना - संजय तोडणकर, संगीत - नंदलाल रेळे, रंगभूषा - प्रदीप पेडणेकर, वेशभूषा - चैताली पाटील, रंगमंच व्यवस्था - ज्योती मुळ्ये, स्वप्नगंधा रसाळ, साई प्रसादे, स्वानंद मयेकर, 
अंकिता हरचेकर. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com