सिंधुदुर्गात सरसरी 109 मिमी पावसाची नोंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जुलै 2016

सिंधुदुर्ग- गेल्या आठ दिवसापासून दमदार पाऊस होत असून सोमवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळू लागला आहे. वेंगुल्यात सर्वाधिक 185.8 मिमी. इतकी पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात सरासरी 109.60 मिमी इतक्‍या पावसाची नोंद मंगळवारी सकाळी 8 वाजता घेण्यात आली. 

आज सकाळीही पावसाचा जोर कायम असून कुडाळ तालुक्‍यातील माणगांव खोऱ्यात उपवडे, शिवापूर, वासोली या भागातील नद्यांना पुरसदृश्‍य पाणी आले असून मुख्य रस्त्यावरील वाहतुक ठप्प झाली आहे. कणकवली-आचरा मार्गावर पाणी आल्याने वाहतुक ठप्प होती. दरम्यान वेंगुर्ला येथील आनंद खोत यांच्या घराची भिंत पडून 25 हजाराचे नुकसान झाले आहे. 

तालुकानिहाय पावसाची नोंद मिलीमीटरमध्ये अशी 

तालुका - आजचा पाऊस - एकूण पाऊस 

दोडामार्ग - 85 - (1349) 

सावंतवाडी - 140 - (1601) 

वेंगुर्ला - 185.80 - (1737.40) 

कुडाळ - 96 - (1450) 

- 102 - (1849) 

कणकवली - 113 - (1447) 

देवगड - 63 - (1616) 

वैभववाडी - 92 - (1127)